ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल…
दिग्गज उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या लेकीने म्हणजेच ईशाने आनंद पिरामलसोबत लग्न केलं आहे. 2018 मध्ये ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचं थाटामाटात लग्न पार पडलं. आता त्यांना 2 जुळी मुलं आहेत. ईशा अंबानी कोणत्याही फंक्शनमध्ये तिच्या रॉयल लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. लोकल डिझायनर्सना प्रोत्साहन देण्यासाठी ईशा अंबानी अनेकदा अबू जानी-संदीप खोसला आणि […]
ADVERTISEMENT

दिग्गज उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या लेकीने म्हणजेच ईशाने आनंद पिरामलसोबत लग्न केलं आहे.
2018 मध्ये ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचं थाटामाटात लग्न पार पडलं. आता त्यांना 2 जुळी मुलं आहेत.
ईशा अंबानी कोणत्याही फंक्शनमध्ये तिच्या रॉयल लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
लोकल डिझायनर्सना प्रोत्साहन देण्यासाठी ईशा अंबानी अनेकदा अबू जानी-संदीप खोसला आणि सब्यासाची यांचे ड्रेसेस घालणं पसंत करते.
फेब्रुवारी 2020 मध्ये मुंबईत अभिनेता अरमान जैन आणि अनिसा मल्होत्रा यांच्या लग्नात ईशाने सब्यासाची मुखर्जीची गोल्डन साडी नेसली होती.
गोल्डन साडीवर साजेसा डायमंड चोकर आणि सिंपल कानातले परिधान केल्याने ती खूपच सुंदर दिसत होती.
ईशाने मुकेश अंबानी यांचा पुतण्या अर्जुन कोठारीच्या प्री-वेडिंग फंक्शनला बकाइन आणि सोन्याच्या जरीची साडी नेसली होती.
ईशाने नेसलेल्या या खास साडीवर सोने-चांदीचे जरदोसी, हिरे, सेक्वीन्स आणि बिगुल मणी यांचे भरतकाम केले होते.
2019 मध्ये, ईशाने लेबलच्या 33 व्या वर्धापन दिनानिमित्त एका फॅशन शोमध्ये भाग घेतला होता. जिथे तिने मेटॅलिक फिनिशसह काळी साडी नेसली होती.
ईशाने स्वत:च्या लग्नात सोने आणि हिऱ्यांनी जडलेल्या ऑफ व्हाइट रंगाच्या दोन शेड्समध्ये 16 पॅनलचा लेहेंगा परिधान केला होता.
या लेहेंग्यात ईशा खूपच सुंदर दिसत होती. त्यावरील काम हाताने करण्यात आलं होतं.