‘केसरकरांची पुढची उडी भाजपात असेल’, कोणी केली बोचरी टीका?
सावंतवाडी येथील आयोजित शिवगर्जना मेळाव्यात शिवसेना (UBT) पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी व्यासपीठावर शिवसेना (UBT) अनेक समर्थक आणि नेते हजर होते. ‘शिवसेनेत काम करताना अनेकांना मातोश्रीवर घेऊन गेलो. मात्र केसरकरांना मातोश्रीवर घेऊन गेलो याचा पश्चाताप आहे.’ असं सुभाष देसाई म्हणाले. ‘राणेंच्या दहशतवादाविरुद्ध शेवटपर्यंत लढणार असे सांगणारे केसरकरचं […]
ADVERTISEMENT

सावंतवाडी येथील आयोजित शिवगर्जना मेळाव्यात शिवसेना (UBT) पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना (UBT) अनेक समर्थक आणि नेते हजर होते.
‘शिवसेनेत काम करताना अनेकांना मातोश्रीवर घेऊन गेलो. मात्र केसरकरांना मातोश्रीवर घेऊन गेलो याचा पश्चाताप आहे.’ असं सुभाष देसाई म्हणाले.
‘राणेंच्या दहशतवादाविरुद्ध शेवटपर्यंत लढणार असे सांगणारे केसरकरचं आज त्यांच्या मांडीवर जाऊन बसले.’
‘केसरकर यांची पुढची उडी ही भाजपात असणार आहे.’
‘भाजपा केसरकरांचा वापर करून टिशू पेपरप्रमाणे फेकून देणार हे त्यांनाही समजणार नाही.’ असा टोला सुभाष देसाईंनी लगावला.
केसरकर भविष्यात भाजपमध्ये असतील असं म्हणत देसाई यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.