‘श्रीकांत शिंदेंनी माझी सुपारी दिलीये’, राऊतांचं फडणवीसांना खळबळजनक पत्र
Sanjay Raut letter to Devendra Fadnavis : ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून, त्यात त्यांनी श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील कुख्यात गुंडांना सुपारी दिली असल्याचा दावा […]
ADVERTISEMENT
Sanjay Raut letter to Devendra Fadnavis : ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून, त्यात त्यांनी श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील कुख्यात गुंडांना सुपारी दिली असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.
ADVERTISEMENT
ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे, तर केंद्रीय निवडणूक आयोगातील कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदेंनी बाजी मारली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्कादायक पत्र लिहिलं आहे.
Maharashtra Crisis Live: …म्हणून उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला -सिब्बल
हे वाचलं का?
संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊतांनी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्यांच्या टोळीचा पत्रात उल्लेख केला आहे. याच टोळीला श्रीकांत शिंदेंनी सुपारी दिली असल्याचा दावा राऊतांनी पत्रात केला आहे.
संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
प्रिय देवेंद्रजी,
ADVERTISEMENT
जय महाराष्ट्र
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.
Maharashtra Political Crisis: बंडखोरी ते सेनेचा ताबा, शिंदेंनी कशी केली मात?
संजय राऊतांवर हल्ल्याची सुपारी दिल्याचं प्रकरण, आदित्य ठाकरे म्हणाले, ‘गद्दार…’
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राबद्दल बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडतायेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ज्या गद्दार आमदारांनी गोळीबार केला, त्यांच्यावर कुठेच कारवाई झाली नाही. अनेक गद्दार आहेत, ज्यांनी धक्काबुक्की किंवा इतर काही केलंय; त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रश्न येतोच ना कि कायदा सुवेवस्था नाही”, असं आदित्य ठाकरेंनी यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT