उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या अडचणीत आणखी वाढ, 4 जिल्हा बँकांना ED ची नोटीस
मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC) प्रकरणात चार सहकारी बँकांच्या पदाधिकाऱ्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेला नोटीस पाठविण्यात आली आहे. ईडीने पाठविलेल्या या नोटीसीमुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार हे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक देखील होते. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC) प्रकरणात चार सहकारी बँकांच्या पदाधिकाऱ्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेला नोटीस पाठविण्यात आली आहे. ईडीने पाठविलेल्या या नोटीसीमुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार हे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक देखील होते. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात अजित पवार यांची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला ईडीने या प्रकरणात जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती. या साखर कारखान्याचा थेट संबंध अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी निगडीत आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता ईडीने चार जिल्हा सहकारी बँकांना देखील नोटीस बजावली आहे. ज्यामुळे अजित पवारांची चिंता वाढू शकते.
कोणत्या चार बँकांना ईडीने पाठवली नोटीस?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
-
पुणे जिल्हा सहकारी बँक
सातारा जिल्हा सहकारी बँक
ADVERTISEMENT
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक
ADVERTISEMENT
रत्नागिरी जिल्हा सहकारी बँक
या चार बँकांच्या पदाधिकाऱ्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या बँकेशी संबंधित अधिकाऱ्यांची ईडी चौकशी करु शकते.
चार बँकांना कर्ज पुरवठा कोणत्या आधारावर केला गेला आहे? त्या कर्जाची परतफेड नियमित होते का? या सगळ्याची माहिती ईडीने संबंधित बँकांकडे मागितली असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.
काही दिवसांपूर्वीच अजित पवारांशी संबंधित कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. याच प्रकरणी जरंडेश्वर कारखान्याला कर्ज पुरवठा केल्याप्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ईडीने नोटीस बजावली आहे.
Devendra Fadnavis on ED: जरंडेश्वर साखर कारखाना आणि अजित पवार… पाहा फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
या नोटीसनुसार जरंडेश्वर कारखान्याला बँकेने 2017 मध्ये 132 कोटींचा कर्जपुरवठा केला असल्याचं समोर आलं आहे. त्यातले 96 कोटी 50 लाख रूपये येणे बाकी आहे. जरंडेश्वर कारखान्याकडून वेळेत परतफेड सुरू असून या कर्जप्रकरणात सक्षम पुरावे, जामीन व मालमत्ता तारण घेतलेली आहे.
ही सर्व माहिती ईडीने मागवली आहे. त्यामुळे ईडीच्या नोटिसीचा कोणताही परिणाम जिल्हा बँकेवर होणार नाही.
जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आल्यानंतर शुक्रवारी (तारीख 9) विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांनी बँकेत थांबून जरंडेश्वरच्या कर्जप्रकरणाची सर्व माहिती घेतली आहे. यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बँकेलाच जरंडेश्वरप्रकरणी नोटीस आल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT