नवाब मलिक ईडी कार्यालयात दाखल, ‘या’ प्रकरणात नोंदवला जात आहे जबाब
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे चर्चेत आलेल्या ईडीने आज महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका नेत्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे ईडी कार्यालयात दाखल झाले असून, अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींकडून मालमत्ता खरेदी प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवला जात आहे. ईडी कार्यालयात जबाब नोंदवला जात असताना पोलिसांनी बाहेर कडेकोट बंदोबस्त […]
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे चर्चेत आलेल्या ईडीने आज महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका नेत्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे ईडी कार्यालयात दाखल झाले असून, अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींकडून मालमत्ता खरेदी प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवला जात आहे.
ईडी कार्यालयात जबाब नोंदवला जात असताना पोलिसांनी बाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. नवाब मलिक यांनी सरदार खान या व्यक्तीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या ३० लाखांत खरेदी केली होती. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही याआधी मलिकांवर हा आरोप केला होता.
सरदार खान हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा हस्तक असून त्याचा १९९३ च्या मुंबई सिरीअल बॉम्ब ब्लास्टमध्येही सहभाग होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सरदार खान सध्या औरंगाबाद जेलमध्ये कैदेत असून दाऊदची बहीण हसीना पारकरच्या एका व्यक्तीने नवाब मलिक यांना या जागेच्या व्यवहारात मदत केल्याचं कळतंय. मलिकांच्या याच व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आता ईडी काय पावलं उचलते आणि नवाब मलिक काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
‘ईडी’वरून राज्यात पेटलं रण; सीतारामन म्हणतात, ‘इच्छा असली तरी तपास थांबवू शकत नाही’
ADVERTISEMENT
कोण आहे सरदार खान ज्याच्याकडून मलिकांनी मालमत्ता विकत घेतल्याचा आरोप आहे?
सरदार शाहवली खान हा १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सरदार खान टायगर मेमनच्या हाताखाली काम करायचा. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि मुंबई महापालिका याची रेकी त्याने केली होती. बॉम्बस्फोट होणार आहेत ही सगळी माहिती खान याच्याकडे होती. ज्या अल हुसैनी इमारतीत कारमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं त्यामध्ये याचा सहभाग होता असाही आरोप फडणवीस यांनी नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता.
काय होते देवेंद्र फडणवीसांनी केलेले आरोप?
मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि सरदार खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
स्वतः नवाब मलिकही काही काळासाठी या कंपनीत संचालक होते. सरदार खान आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा फक्त ३० लाखांत विकली आहे. त्यातले २० लाखच दिले आहेत. मला जी माहिती आहे त्यानुसार भाडे तत्त्वावर ही जागा दिली असेल त्यातून सॉलिडसला एक कोटी रूपये भाडं मिळतं आहे असंही फडणवीस म्हणाले होते.
ADVERTISEMENT