एकनाथ शिंदे यांची संपूर्ण माहिती : पत्नी, कुटुंब, संपत्ती आणि मातोश्रीला आव्हान… असा आहे प्रवास

मुंबई तक

एकनाथ शिंदे! आनंद दिघे आणि ठाणे जिल्ह्याच्या चर्चेत राहणार एकनाथ शिंदे हे नाव जून 2022 मध्ये झालेल्या राजकीय भूकंपाने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पोहोचलं. शिवसेनेत सर्वोच्च स्थानी मानल्या जाणाऱ्या मातोश्री आणि ठाकरे घराण्यालाच एकनाथ शिंदेंनी आव्हान दिलं. 40 आमदारांना सोबत घेऊन बंडाचं निशाण फडकावलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं. त्यामुळे एकनाथ शिंदे एका रात्रीत […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
google news

एकनाथ शिंदे! आनंद दिघे आणि ठाणे जिल्ह्याच्या चर्चेत राहणार एकनाथ शिंदे हे नाव जून 2022 मध्ये झालेल्या राजकीय भूकंपाने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पोहोचलं. शिवसेनेत सर्वोच्च स्थानी मानल्या जाणाऱ्या मातोश्री आणि ठाकरे घराण्यालाच एकनाथ शिंदेंनी आव्हान दिलं. 40 आमदारांना सोबत घेऊन बंडाचं निशाण फडकावलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं. त्यामुळे एकनाथ शिंदे एका रात्रीत देशात पोहोचले. मात्र, ठाकरेंना आव्हान देण्याची ताकद शिंदेंमध्ये कशी आली. एकेकाळी उदरनिर्वाहासाठी रिक्षाचालवणारे शिंदे मुख्यमंत्री पदापर्यंत कसे पोहोचलो. त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत? वाचा संपूर्ण माहिती…

एकनाथ शिंदे जन्म तारीख आणि शिक्षण

पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे राजकीय नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. सातारा जिल्ह्यातील जावळी हे त्यांचं जन्मगाव. बालपणीच एकनाथ शिंदे यांचे आईवडील गावातून स्थलांतरित झाले आणि मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहरात स्थायिक झाले.

एकनाथ शिंदे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झालेला. ते वारंवार याचा उल्लेखही करतात. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील किसन नगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. ठाण्यातीलच राजेंद्र पाल मंगला हिंदी हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढे घरच्या आर्थिक स्थितीमुळे एकनाथ शिंदेंना शिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागलं. पण पुढे एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी घेतली.

एकनाथ शिंदेंच्या कुटुंबात कोण कोण? दोन मुलांचं अकाली निधन

एकनाथ शिंदे आणि लता शिंदे या जोडप्याला तीन मुले झाली. दिपेश, शुभदा आणि श्रीकांत, अशी त्यांची नावं. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करत असतानाच्या काळातच त्यांच्यावर मोठा आघात झाला होता.

हे वाचलं का?