एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमेदवारी?
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे हे गेल्या दोन वर्षांपासून राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. या सगळ्यात आता विधान परिषदेच्या निवडणुकाही आल्या आहेत. या निवडणुकीत एकनाथ खडसेंना आमदारकीची लॉटरी लागू शकते. विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात पक्ष संघटना मजूबत करण्यासाठी आणि भाजपला नामोहरम […]
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे हे गेल्या दोन वर्षांपासून राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. या सगळ्यात आता विधान परिषदेच्या निवडणुकाही आल्या आहेत. या निवडणुकीत एकनाथ खडसेंना आमदारकीची लॉटरी लागू शकते.
ADVERTISEMENT
विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात पक्ष संघटना मजूबत करण्यासाठी आणि भाजपला नामोहरम करण्यासाठी शरद पवार ही खेळी करतील अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये होणारी कुचंबणा शरद पवारांनी लक्षात घेतली आणि त्यांना राष्ट्रवादीत घेण्याची खेळी त्यांनी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उघड उघड विरोध एकनाथ खडसेंनी अनेकदा केलेला आपण पाहिला आहे.
आता एकनाथ खडसे विधानपरिषदेवर जर आमदार म्हणून आले तर पुन्हा एकदा ते भाजप विरोधात आणि खासकरून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होतीलच. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ईडी चौकशी, आजारपण यामुळे फारसे सक्रिय होऊ शकले नव्हते. एकनाथ खडसेंना जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला तेव्हाच ते विधान परिषदेमार्गे आमदार होतील आणि मग मंत्रिपद मिळवतील अशी चर्चा रंगली होती. आता विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी त्यांना संधी दिली जाईल असं बोललं जातं आहे.
हे वाचलं का?
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात खालच्या पातळीवर जाऊन टीका, वातावरण तापलं
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीत एकनाथ खडसेंच्या नावाचा समावेश करून त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते. मात्र राज्यपालांनी ही यादी अद्याप स्वतःकडेच ठेवली आहे त्यावर काही निर्णयच घेतलेला नाही. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसेंची आमदारकी ही भाजपमुळेच लांबणीवर पडली. आता विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये एकनाथ खडसेंना राष्ट्रवादी संधी देण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
भाजपचे दहशतवाद्यांशी संबंध एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसेंसारखा मजबूत नेता मिळाला आहे. त्यामुळे आता प्रदेशात पक्ष विस्तार करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला संधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंना विधान परिषदेत उमेदवारी दिली तर आपला प्रभाव वाढवणं राष्ट्रवादीला आणखी सोपं जाणार आहे. भाजपच्या गिरीश महाजनांसमोर खडसे समर्थकांचं आव्हान उभं करता येईल अशीही शरद पवारांची खेळी असू शकते.
राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून बड्या नेत्यांना लक्ष केलं जातं आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक हे दोघे सध्या तुरुंगात आहेत. संजय राठोड यांना मंत्रिपद गमवावं लागलं आहे. शिवसेनेतल्या नेत्यांनाही लक्ष्य केलं जातं आहे. अशात एकनाथ खडसेंना आमदारकी देऊन भाजप विरोधातच उभं करायचं हे टार्गेट कदाचित राष्ट्रवादीने ठेवलं असावं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT