एकनाथ शिंदे गटाकडून चिन्हासाठीचे तीन पर्याय सादर, जाणून घ्या काय आहेत हे पर्याय?
एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. मात्र शिंदे गटाला चिन्ह मिळालेलं नाही. हे चिन्ह आज निश्चित होऊ शकतं. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्हासाठीचे तीन पर्याय ठेवण्यासाठी आज सकाळी १० वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार शिंदे गटाने तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवले आहेत. आता यातलं कुठलं चिन्ह शिंदे गटाला मिळणार हे पाहणं […]
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. मात्र शिंदे गटाला चिन्ह मिळालेलं नाही. हे चिन्ह आज निश्चित होऊ शकतं. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्हासाठीचे तीन पर्याय ठेवण्यासाठी आज सकाळी १० वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार शिंदे गटाने तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवले आहेत. आता यातलं कुठलं चिन्ह शिंदे गटाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
काय आहेत शिंदे गटाने ठेवलेले तीन पर्याय?
सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचं झाड असे तीन पर्याय शिंदे गटाने निवडणूक आयोगसमोर ठेवले आहेत. जे पर्याय ठाकरे गटाकडून ठेवण्यात आले होते त्यातलं मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळालं आहे. आता शिवसेनेच्या शिंदे गटाला काय चिन्ह मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिंदे गटाने चिन्हासाठी दिलेले तिन्ही पर्याय फेटाळून लावले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने आज सकाळपर्यंत नवीन चिन्हाचा पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे निवडणूक चिन्हाचे पर्याय पाठवले होते. यामध्ये तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हा पर्याय पाठवला होता. त्यापैकी निवडणूक आयोगाने तळपता सूर्य हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याची अधिक शक्यता आहे.
हे वाचलं का?
शिवसेनेच्या ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिलं आहे. ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीन चिन्हांचा पर्याय दिला होता. त्रिशूळ धार्मिक चिन्ह असल्याने देता येणार नाही असं निवडणूक आयोगाने सांगितलं. तर उगवता सूर्य हे तामिळनाडूतल्या द्रमुक पक्षाचं चिन्ह असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं होतं. त्यानंतर आता मशाल हे चिन्ह शिवसेनेला मिळालं आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या चिन्हं ही ठाकरे गटासारखीच होती. त्यामुळे त्यांना आज सकाळी १० पर्यंत मुदत देण्यात आली होती. ज्यानुसार आता नवी चिन्ह इमेल करण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT