Narayan Rane: ‘शिंदे.. कोणाला पैसे नेऊन देत होते?’, राणेंचे ठाकरेंवर आरोप
BJP minister Narayan Rane has criticized Uddhav Thackeray: मुंबई: ‘तुझ्या शिवसेनेत असताना मंत्री होता ना एकनाथ शिंदे.. पैसे कोणाला नेऊन देत होता? सगळी खाती हेच लोक चालवत होते. एकनाथ वैगरे नावाला होते.’ असा गंभीर आरोप भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर आता महाराष्ट्रात शिवसेनेचं (Shiv Sena) काही […]
ADVERTISEMENT

BJP minister Narayan Rane has criticized Uddhav Thackeray: मुंबई: ‘तुझ्या शिवसेनेत असताना मंत्री होता ना एकनाथ शिंदे.. पैसे कोणाला नेऊन देत होता? सगळी खाती हेच लोक चालवत होते. एकनाथ वैगरे नावाला होते.’ असा गंभीर आरोप भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर आता महाराष्ट्रात शिवसेनेचं (Shiv Sena) काही राहिलेलं नाही, शिवसेनेचं दुकान बंद झालं आहे. अशी टीका नारायण राणेंनी यावेळी केलं आहे. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यातच उद्या (9 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प (Budget) मांडला जाणार आहे. असं असताना नारायण राणे यांनी अचानक विधिमंडळात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जहरी टीकाही केली. (eknath shinde was giving money to whom narayan ranes serious accusations against uddhav thackeray)
पाहा नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर काय टीका केली
‘उद्धव ठाकरेंनी कोणाला कानाखाली पण नाही मारली’
‘आता शिवसेना संपलीय.. काही राहिलेलं नाही. उरलेले 15 पण त्यांच्या हाताशी राहत नाही निवडणुकीपर्यंत. उद्धव ठाकरेची ताकदच नाही.. मंत्रालयात यायची ताकद नव्हती तर महाराष्ट्र पिंजून काढणार? शक्य आहे का..’
‘अरे.. उद्धव ठाकरेला बोलताना त्रास होतो.. 20 पावलं चालू शकत नाही आणि घणाघात? वाघ वैगरे दाखवायचं.. अरे कशाला.. ते वय नाही राहिलं आता. त्या वयात पण काही करू शकले नाही. शिवसेना जी घडली त्यामध्ये उद्धव ठाकरेने कोणाला कानाखाली पण नाही मारली. हा त्यांचा इतिहास आहे.’
‘राणे तुला पूर्ण नागडा करीन…’, राऊतांच्या संयमाचा स्फोट; काय घडलं?