Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला जन्मठेपेची शिक्षा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

 encouter specialist pradeep sharma life imprisonment mumbai high court decision lakhan bhaiya encounter case
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
social share
google news

 Pradeep Sharma sentenced to life imprisonment : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2006 साली झालेल्या लखन भैय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवत, जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. दरम्यान हे लखन भैय्या फेक एन्काऊंटर प्रकरण काय होतं? हे जाणून घेऊयात  ( encouter specialist pradeep sharma life imprisonment mumbai high court decision lakhan bhaiya encounter case) 

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील 16 याचिकांच्या सुनावणीवर  8 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज कोर्टात या प्रकरणावर निकाल देण्यात आला. या निकालात 2006 साली झालेल्या लखन भैय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवण्यात आले होते. तसेच या प्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

लखन भैया एन्काऊंटर प्रकरण काय? 

मुळचा वसईचा असलेला राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैया हा गँगस्टर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा जवळचा सहकारी होता. मुंबईत तो छोटा राजनसाठी काम करायचा. प्रदीप शर्मा यांच्या टीमकडून लखन भैयाला ‘अनिल भेडा’ या व्यक्तीसोबत नवी मुंबईतल्या वाशी येथून उचलण्यात आले. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईतल्या वर्सोव्यातील नाना नानी पार्कमध्ये लखन भैयाचे एनकाऊंटर करण्यात आले. हे एनकाऊंटर 2006 मध्ये करण्यात आले  होते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : "श्रीनिवास बापू आमचं ठरलंय...", अजित पवारांच्या भावाला प्रत्युत्तर

लखन भैय्याच्या एनकाऊंटरनंतर चारच दिवसात लखन भैय्याच्या भावाने बॉम्बे हाय कोर्टात धाव घेतली आणि हे एनकाऊंटर नसून लखन भैय्याचा थंड डोक्याने खून करण्यात आला आहे असा आरोप केला. या साऱ्या प्रकरणाची जेव्हा 2013 मध्ये चौकशी कऱण्यात आली तेव्हा असे आढळले की लखन भैय्या याच्यावर पॉईंट ब्लँक रेंजवरुन गोळी झाडण्यात आली आणि त्याचा खून करण्यात आलाय. एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे या पथकाचे प्रमुख होते. 

दरम्यान 2013 साली मुंबईच्या सत्र न्यायालयाने या प्रकरणात 13 पोलिसांसह 21 लोकांना दोषी ठरवले होते आणि सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर कोर्टाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली. 

ADVERTISEMENT

त्यानंतर पुन्हा लखन भैय्याच्या भावाने प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता केल्याप्रकरणी याचिका दाखल करून शिक्षा वाढवण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवण्यापूर्वी, राम प्रसाद गुप्ता यांनी 2013 ची पुर्नयाचिका मागे घेतली, ज्यामध्ये त्यांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात राज्य सरकारने अपीलही दाखल केले होते. राज्य सरकारने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील राजीव चव्हाण यांनी प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष मुक्ततेच्या विरोधात युक्तिवाद केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Prakash Ambedkar : "ठाकरे, पवारांवर विश्वास नाही"

याचिकाकर्ते राम प्रसाद गुप्ता यांच्या वतीने वकील युग मोहित चौधरी यांनी युक्तिवाद केला. 2006 मध्ये लखन भैय्याचा एन्काऊंटर हा सुनियोजित कट होता, असे या दोघांनी न्यायालयासमोर सांगितले. ही चकमक बनावट होती आणि ती लपवण्यासाठी पोलिसांनी खोटे पुरावे तयार केले होते.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, चकमकीत 12 पोलीस सामील होते, तर याचिकेच्या सुनावणीदरम्यान, या 12 पैकी 7 जणांनी असा युक्तिवाद केला की ते कधीही एन्काउंटर टीमचा भाग नव्हते. लखन भैय्याचा भाऊ राम प्रसाद गुप्ता यांनीही सांगितले की बॅलिस्टिक अहवाल आणि कॉल डेटा रेकॉर्डवरून असे दिसून येते की प्रदीप शर्मा चकमकीच्या ठिकाणी उपस्थित होता आणि लखन भैय्याला संपवण्याचा मुख्य कट त्याच्याकडूनच रचला गेला होता.

 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT