Prakash Ambedkar : "ठाकरे, पवारांवर विश्वास नाही", आंबेडकरांची काँग्रेसला ऑफर, पत्राने खळबळ

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

prakash ambedkar letter to mallikarjun kharge to support 7 lok sabha seath udhhav thackeray ubt ncp sharad pawar maha vikas aghadi seat sharing maharashtra politics
वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहले आहे.
social share
google news

Prakash Ambedkar letter to Mallikarjun Kharge : आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. मात्र तरी देखील महाविकास आघाडीत अद्याप प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला नाही. असे असले तरी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेत प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली होती. आंबेडकरांच्या या उपस्थितीनंतर वंचितचा मविआत समावेश होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आहे. असे असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी एक पत्र लिहून पुन्हा एकदा खळबळ उडवून टाकली आहे. त्यामुळे नेमकं या पत्रात काय आहे? हे जाणून घेऊयात.  (prakash ambedkar letter to mallikarjun kharge to support 7 lok sabha seath udhhav thackeray ubt ncp sharad pawar maha vikas aghadi seat sharing maharashtra politics) 

वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी थेट काँग्रेस अध्यक्ष  मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहले आहे. या पत्रातून प्रकाश आंबेडकरांनी लिहले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आणि वंचित आघाडीला जागावाटपाच्या बैठकीचे निमंत्रण न देता महाविकास आघाडीच्या बैठका सूरू आहेत. त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या अनेक बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींना ऐकून घेत नाही आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांवरचा आमचा विश्वास उडाला आहे. आम्हाला सापत्न दुष्टीकोण देण्यात येत असल्याचाही आरोप आंबेडकरांनी यावेळी केला. 

हे ही वाचा : शिंदे-पवारांमुळेच भाजपवर राज ठाकरेंना सोबत घेण्याची वेळ आली?

काँग्रेसमोर ठेवला नवीन प्रस्ताव 

आता वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 7 मतदार संघाची माहिती द्यावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे. काँग्रेसच्या पसंतीच्या 7 जागांवर वंचित काँग्रेस उमदेवारांना पुर्ण पाठिंबा देईल. वंचितने काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही आहे, असे प्रकाश आंबडेकरांनी पत्रात म्हटले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : "आपली उमेदवारी फिक्स", काँग्रेसच्या धानोरकर-वडेट्टीवारांमध्ये 'संघर्ष'

प्रकाश आंबेडकरांच्या पत्रात काय? 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेत भेट झाली, याचा आनंद आहे. आम्हाला फार काळ चर्चा करता आली नाही म्हणून पत्र लिहत आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आणि वंचित आघाडीला जागावाटपाच्या बैठकीचे निमंत्रण न देता महाविकास आघाडीच्या बैठका सूरू आहेत. त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या अनेक बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींना ऐकून घेत नाही आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांवरचा आमचा विश्वास उडाला आहे. आम्हाला सापत्न दुष्टीकोण देण्यात येत आहे. 

ADVERTISEMENT

वंचितचा प्राईम अजेंडा भाजप-आरएसएसला हटवा हाच आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रातील 7 जागांवर वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 7 मतदार संघाची माहिती द्यावी, काँग्रेसच्या पसंतीच्या 7 जागांवर वंचित काँग्रेस उमदेवारांना पुर्ण पाठिंबा देईल. वंचितने काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही आहे, असे प्रकाश आंबडेकरांनी पत्रात म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT