Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन व्हेरिएंट किती धोकायदायक? लस प्रभावी आहे का?
कोरोनाच्या संकटाशी तोंड देत असलेल्या जगाची पुन्हा एकदा झोप उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीनच व्हेरिएंट (विषाणूचा नवीन प्रकार) आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं अर्थात WHO ने या व्हेरिएंटला ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) असं नाव दिलं असून, हा व्हेरिएंट प्रंचड धोकायदायक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या व्हेरिएंटचा संसर्गाचा वेग डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही जास्त […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या संकटाशी तोंड देत असलेल्या जगाची पुन्हा एकदा झोप उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीनच व्हेरिएंट (विषाणूचा नवीन प्रकार) आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं अर्थात WHO ने या व्हेरिएंटला ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) असं नाव दिलं असून, हा व्हेरिएंट प्रंचड धोकायदायक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या व्हेरिएंटचा संसर्गाचा वेग डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. वेगवेगळ्या चर्चा या व्हेरिएंटबद्दल सुरू असून, तर जाणून घेऊया या व्हेरिएंटबद्दल…
व्हेरिएंट आणि म्युटेशन म्हणजे काय?
व्हायरसचाही जिनोम सिक्वेन्स (जनुकीय रचना) असतो. व्हायरच्या जिनोममध्ये सातत्याने बदल होतं जातो, त्यालाच म्युटेशन असं म्हटलं जातं. कोरोना व्हायरच्या जिनोममध्येही सातत्याने बदल होत असून, जगभरात चार व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (अल्फा, बीटा, गामा, डेल्टा ), तर दोन व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट (ल्युम्ब्डा, म्यू) आढळून आले आहेत. यातच आता दक्षिण आफ्रिकेत B.1.1.529 हा व्हेरिएंट आढळून आला असून, तो व्हेरिएंट ऑफ कन्सर्न आहे. B.1.1.529 या कोरोना व्हेरिएंट जागतिक आरोग्य संघटनेनं ओमिक्रॉन व्हेरिएंट असं नाव दिलं आहे.
दक्षिण आफ्रिकेतील नेटवर्क फॉर जिनोमिक्स निगराणी नेटवर्क अर्थात NGS-SA (Network for Genomics Surveillance in South Africa) ला सोमवारी (22 नोव्हेंबर) हा नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट आल्याचं प्रथम जाहीर करण्यात आलं. या व्हेरिएंटमध्ये SARS-CoV-2 संबंधित व्हायरस आढळून आले आहेत.









