नागपूर : कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू, पती आणि नातेवाईकांकडून हॉस्पिटलची तोडफोड
एकीकडे राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असताना उप-राजधानी नागपुरात एक धक्कादायक प्रकार पहायला मिळाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या २९ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या पती आणि नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली आहे. नागपूरच्या होप हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकच नव्हे तर मयत महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर पेट्रोल टाकून आगही लावली. पोलिसांनी […]
ADVERTISEMENT
एकीकडे राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असताना उप-राजधानी नागपुरात एक धक्कादायक प्रकार पहायला मिळाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या २९ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या पती आणि नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली आहे. नागपूरच्या होप हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकच नव्हे तर मयत महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर पेट्रोल टाकून आगही लावली.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. परंतू महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पती आणि नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनावर बेजबाबदारपणाचा आरोप लावत गोंधळ घालायला सुरुवात केली. मृतदेह ताब्यात देण्यासाठी हॉस्पिटल प्रशासन दीड लाख मागत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यावेळी वातावरण गंभीर झालेलं असताना नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करायला सुरुवात केली, ज्यात हॉस्पिटलमधील दरवाजे, खुर्च्या यांची तोडफोड करण्यात आली. रिसेप्शनवर पेट्रोल टाकून नातेवाईकांनी आग लावल्यामुळे इथे तणावाचं वातावरण निर्माण झालं.
हे वाचलं का?
दरम्यान पाचपावली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर पोहचून ताबडतोक परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. या हॉस्पिटलमध्ये ७१ रुग्ण उपचार घेत आहेत, त्यामुळे आगीवर योग्य वेळी नियंत्रण मिळवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जातंय. दरम्यान हॉस्पिटलमध्ये तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT