Lockdown च्या भीतीने पुण्यातले परप्रांतीय कामगार निघाले गावाला, स्टेशनवर वाढली गर्दी

महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लादले आहेत. मात्र राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय या भीतीने पुण्यात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांनी गावाची वाट धरली आहे. हे परप्रांतीय कामगार गावी निघाले असल्याने पुणे स्टेशनवर त्यांची गर्दी पाहण्यास मिळते आहे. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. अशात जर पुन्हा लॉकडाऊन लागला तर […]

ADVERTISEMENT

MumbaiTak
Google CTA

महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लादले आहेत. मात्र राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय या भीतीने पुण्यात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांनी गावाची वाट धरली आहे. हे परप्रांतीय कामगार गावी निघाले असल्याने पुणे स्टेशनवर त्यांची गर्दी पाहण्यास मिळते आहे. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. अशात जर पुन्हा लॉकडाऊन लागला तर गेल्यावर्षी प्रमाणे आम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. अशी प्रतिक्रिया देत हे परप्रांतीय कामगार गावाला निघाले आहेत.

Lockdown मुळे मुंबईच्या डबेवाल्यांवर मजुरी, हमाली करण्याची वेळ

रेल्वे प्रशासनाच्यावतीने देखील एप्रिल महिन्यात पुणे ते दनापूर ही विशेष गाडी सुरू केली आहे. तर मुंबई ते गोरखपूर, पटना, दरभंगा आणि पुणे ते दनापूर, अशा अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. आठवड्यातून दोन दिवस हे विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष ट्रेनमधून जाता येणार आहे. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि व्यवस्थानाच्या वेळी कोरोना प्रतिबंधाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे. जोपर्यंत नियमित रेल्वे सुरू होत नाही तोपर्यंत अश्या पद्धतीने विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.त्यामुळे प्रवाशांनी स्थानकांवर लवकर येऊन गर्दी करु नये असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

लोकांनी अकारण गर्दी करू नये ज्या लोकांचं तिकिट कन्फर्म आहे अशांनाच गाडीने जाता येतं आहे. पुण्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी आहे. त्यामुळे लोकांनी अकारण गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग करू नये असंही आवाहन रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी केलं आहे.