Pradeep Sharma च्या सांगण्यावरुन Hiren यांची हत्या, NIA चा कोर्टात दावा; २८ जूनपर्यंत शर्मा NIA कोठडीत
मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलाचे माजी अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना कोर्टाने २८ जूनपर्यंत NIA च्या कोठडीत धाडलं आहे. प्रदीप शर्मा यांच्यासोबत NIA ने अटक केलेल्या सतीश मोथकुरी उर्फ विकी बाबा आणि मनिष सोनी या दोघांनाही NIA कोठडी सुनावण्यात आली आहे. Pradeep Sharma: पोलीस अधिकारी ते शिवसेना नेता… […]
ADVERTISEMENT
मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलाचे माजी अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना कोर्टाने २८ जूनपर्यंत NIA च्या कोठडीत धाडलं आहे. प्रदीप शर्मा यांच्यासोबत NIA ने अटक केलेल्या सतीश मोथकुरी उर्फ विकी बाबा आणि मनिष सोनी या दोघांनाही NIA कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Pradeep Sharma: पोलीस अधिकारी ते शिवसेना नेता… कोण आहेत प्रदीप शर्मा?
प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरुन मनसुख हिरेन यांच्या हत्येत आपला सहभाग मनिष आणि सतीश यांनी मान्य केला असल्याचा दावा NIA ने कोर्टात केला. प्रदीप शर्मा यांच्या घरात केलेल्या छापेमारीत NIA ला मोठ्या प्रमाणात रोखरक्कम सापडली असल्याची माहीती NIA ची बाजू कोर्टात मांडणारे special public prosecutor सुनील गोन्जालविस यांनी दिली.
हे वाचलं का?
“प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्या सांगण्यावरुन मनसुख हिरेन यांच्या हत्येत आपला सहभाग मनिष आणि सतीश यांनी मान्य केला आहे. हिरेन यांची गळा आवळून हत्या करण्यात आली ज्यानंतर त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आला. या हत्येसाठी त्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळाली होती. हिरेन यांची हत्या केल्यानंतर त्यांनी वाझे आणि शर्मा यांना फोन करुन याबद्दल माहिती दिली. छापेमारीत शर्मा यांच्या घरी सापडलेल्या शस्त्राचं लायसन्सही संपलेलं आहे”, अशी माहिती NIA च्या वकीलांनी कोर्टात दिली.
Pradeep Sharma Arrested : “उद्धव ठाकरे खरे गॉडफादर! मनसुख प्रकरणात अटकेतील सर्वांचा शिवसेनेशी संबंध हा योगायोग नाही”
ADVERTISEMENT
प्रदीप शर्मा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. “माझ्या घरात सापडलेलं शस्त्र हे अवैध नाहीये ते मी स्वतः खरेदी केलंय. वाझे आणि माझ्यात कोणताही संपर्क नव्हता. मनिष सोनी आणि सतीष यांना मी ओळखत नाही. मी NIA ला त्यांच्या तपासात सहकार्य केलं आहे. अटकेत असलेल्या संतोष शेलारला मी ओळखतो, तो १२ वर्ष माझा खबरी म्हणून काम करत होता. मुंबई पोलिसांमध्ये दोन गट आहेत त्यातील एका गटाने हा कट रचला आहे. जर मी या प्रकरणात सहभागी असतो तर हे प्रकरण उजेडात येईपर्यंत घरीच थांबलो नसतो.”
ADVERTISEMENT
NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरेन यांची हत्या लाल रंगाच्या टवेरा गाडीमध्ये झाली. अटकेत असलेला माजी पोलीस अधिकारी सुनील मानेने हिरेनला या टवेरा गाडीपर्यंत आणलं. त्यावेळी या गाडीत ४ लोकं होती, ज्यात मनिष, सतीष, संतोष शेलार आणि आनंद जाधव यांचा समावेश होता. हिरेन यांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी शर्मा आणि वाझेला याबद्दलची माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणात NIA आणखी कोणत्या धक्कादायक बाबी समोर आणतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Mansukh यांच्या हत्येसाठी वापरलेली गाडी अनिल परबांच्या पार्टनरने दिली – किरीट सोमय्यांचा आरोप
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT