भिवंडी: कोरोनावरील दुसरी लस घेतल्यानंतर 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
भिवंडी: देशात आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जोमाने सुरुवात झाली आहे. यासाठी अनके ठिकाणी लोकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, यादरम्यान एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल (2 मार्च) ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एका लसीकरण केंद्रावर कोव्हिड-19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पण हा मृत्यू नेमका […]
ADVERTISEMENT

भिवंडी: देशात आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जोमाने सुरुवात झाली आहे. यासाठी अनके ठिकाणी लोकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, यादरम्यान एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल (2 मार्च) ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एका लसीकरण केंद्रावर कोव्हिड-19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पण हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबतचं नेमकं कारण हे पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच समोर येणार आहे. मात्र, ही घटना समोर आल्यानंतर भिवंडीसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव सुखदेव किरदत असं असून तो भिवंडीतील डोळ्यांचा डॉक्टरांकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यामुळे तो फ्रंटलाइन वर्कर या प्रकारात मोडत असल्याने त्याने 28 जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर काल (मंगळवार) त्याने कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. पण हा डोस घेतल्यानंतर त्याचा काही वेळाने मृत्यू झाला. सुखदेव हा मूळचा ठाण्यातील रहिवासी आहे.
त्यावेळी नेमकं काय झालं?
28 जानेवारीला पहिली लस घेतल्यानंतर काल (2 मार्च) सुखदेवला दुसरा डोस घ्यायचा होता. त्यामुळे तो भिवंडीतील लसीकरण केंद्रावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास पोहचला. दुसरा डोस दिल्यानंतर सुखदेवला काही वेळासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. पण काही वेळानंतर सुखदेव हा बेशुद्ध पडल्याचे आढळून आले. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्याला तात्काळ भिवंडीच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथे पोहचण्यापूर्वीच सुखदेवचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.