अंबरनाथ एमआयडीसीत गॅस गळती; 30 जणांची श्वास कोंडल्याने प्रकृती बिघडली
अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. आरके केमिकल्स कंपनीत ही गॅस गळती झाली असून, त्यामुळे 30 जणांची श्वास गुदमरल्या प्रकृती बिघडली आहे. या सर्वांना उल्हानगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतं. (Gas Leakage in Ambernath MIDC, 34 people have been admitted to a hospital) […]
ADVERTISEMENT
अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. आरके केमिकल्स कंपनीत ही गॅस गळती झाली असून, त्यामुळे 30 जणांची श्वास गुदमरल्या प्रकृती बिघडली आहे. या सर्वांना उल्हानगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतं. (Gas Leakage in Ambernath MIDC, 34 people have been admitted to a hospital)
ADVERTISEMENT
अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसीत आर.के. केमिकल्स नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये सल्फ्युरिक ॲसिडवर डिस्टिलेशनची प्रक्रिया केली जाते. कंपनीत नेहमीप्रमाणे डिस्टिलेशनची प्रक्रिया सुरू असताना 10 वाजताच्या सुमारास अचानक प्लांटमधील एक पाईप निसटला आणि त्यातून गॅस गळती सुरू झाली.
हे वाचलं का?
गॅसने वेगानं हवेत पसरण्यास सुरुवात झाली. गळती होऊन गॅस थेट बाजूलाच असलेल्या प्रेस फिट नावाच्या कंपनीत शिरला. त्यामुळे तिथे काम करत असलेल्या 30 कामगारांना अचानक उलट्या, मळमळ, गुदमरण्याचा त्रास सुरू झाला.
ADVERTISEMENT
गॅसमुळे श्वास कोंडून आणि उलट्या झालेल्या कामगारांमध्ये 27 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. गॅसमुळे प्रकृती बिघडलेल्या कामगारांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या कर्मचाऱ्यांनी गॅस गळतीमुळे प्रचंड त्रास झाल्याचं उपचार घेत असलेल्या काही कामगारांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी अग्निशमन दल, शिवाजीनगर पोलीस व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस गळती प्रकरणी कंपनीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी म्हटलं आहे.
‘आरे.के. कंपनी गॅस गळती झाली आणि तो गॅस बाजूच्या कंपनीत गेल्यानं कामगारांना बाधा झाली. यात ३० कामगारांना बाधा झाली. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार केले जात आहे. सर्वांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचं लक्ष आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शिंदे यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT