ड्रग्ज केस : आर्यनची सुटका होत नाही तोपर्यंत खीर बनणार नाही – गौरी खानची नवीन ‘मन्नत’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB च्या अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर २० तारखेला कोर्टात सुनावणी होणार आहे. २ ऑक्टोबर रोजी NCB ने मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर छापेमारी करुन ८ जणांना अटक केली होती, ज्यात आर्यन खानचाही समावेश होता. जामीन मिळवण्यासाठी आर्यनचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर त्याला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलंय. मुलाच्या अटकेमुळे सध्या शाहरुखच्या घरी मन्नतवर तणावाचं वातावरण आहे.

ADVERTISEMENT

सध्या सणासुदीच्या दिवसांमध्येही मुलाच्या अटकेमुळे मन्नतमध्ये शाहरुख आणि गौरी कोणत्याही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये नाहीयेत. एरवी दिवाळी असो किंवा ईद या सणांच्या दिवशी मन्नत बंगल्यावर विशेष रोषणाई केली असते. नवरात्रीच्या दिवसांमध्ये गौरीने आर्यनच्या सुटकेसाठी नवसही केला होता. तसेच गौरीने आर्यनती जोपर्यंत सुटका होत नाही तोपर्यंत घरात कोणत्याही प्रकारे गोडधोड बनवलं जाणार नाही. शाहरुखच्या घरातील एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, घरातल जेवणं बनवणारा व्यक्ती खीर बनवत असल्याचं लक्षात आल्यानंतर गौरीने त्याला तात्काळ थांबायला सांगितलं.

आर्यनसाठी गौरी खानने ठेवलाय नवस, नवरात्र उत्सवात गोडधोड खाणं सोडलं

हे वाचलं का?

जोपर्यंत आर्यन तुरुंगातून बाहेर येत नाही तोपर्यंत घरात गोड पदार्थ बनवायचे नाहीत असा आदेश गौरीने आपल्या किचन स्टाफला दिला आहे. आर्यनच्या अटकेनंतर गौरी भावूक झाली आहे. शाहरुख आणि गौरी आर्यनच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असून त्यांचा प्रत्येक दिवस फोनवर वकीलांशी सल्लामसलत करण्यात जातो आहे. शाहरुख आणि गौरी दोघांनीही आर्यनच्या सुटकेसाठी प्रार्थना करा असा संदेश आपल्या जवळच्या मित्रांना पाठवला आहे.

आर्यनच्या अटकेनंतर मन्नतबाहेर प्रसारमाध्यमांचा गराडा पडलेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गर्दी टाळण्यासाठी शाहरुखने आपल्या बॉलिवूडमधील मित्र-मैत्रिणींना मन्नतवर न येण्याचं आवाहन केलं आहे. आर्यनच्या सुटकेसाठी कायद्याप्रमाणे जे काही करावं लागेल ते करण्याची तयारी शाहरुखने ठेवली जाईल. ही वेळही जाईल असं शाहरुख आपल्या मित्रांशी बोलताना वारंवार म्हणत असल्याचंही जवळच्या सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे बुधवारी कोर्ट आर्यनच्या जामीन अर्जावर काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT