Lakimpur kheri : लव्ह आणि लिव्ह-इन… गर्लफ्रेंडकडून प्रियकराची निर्दयीपणे हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

girlfriend killed her live in relationship partner lakhimpur kheri uttar pradesh
girlfriend killed her live in relationship partner lakhimpur kheri uttar pradesh
social share
google news

देश आता मॉर्ड़न होत चालला आहे. विदेशी नागरीकांसारखी विचारसरणी आणि राहणीमान अंगिकारू लागला आहे. त्याचाच परिणामस्त्रोत देशात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत चालली आहे. अशात उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खेरीतून (lakhimpur kheri) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका लिव्ह इन पार्टनरने (Live in Partner) तरूणाची हत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याची गर्लफ्रेंड (girlfriend) लिव्ह इन पार्टनरलाच ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या घटनेने राज्य हादरलं आहे. (girlfriend killed her live in relationship partner lakhimpur kheri uttar pradesh)

घटनाक्रम काय?

लखीमपुर खेरीच्या (lakhimpur kheri) चमरुआ गावात एका मुलाच्या हत्येची घटना घड़ली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या थाना फरधान क्षेत्रातील कोरेय्या गावात एका तरूणाची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. पोस्टमार्टम रीपोर्टमध्ये याबाबतचा खुलासा देखील झाला होता. या तरूणाची हत्या त्याच्या गर्लफ्रेंडने (girlfriend) केली होती. मृत तरूणाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरूणीला अटक केली आहे.

हे ही वाचा : वरातीत दोन गटात वाद अन् तरूणाची निर्घृण हत्या, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

3 वर्ष लिव इनमध्ये राहिला

लखीमपुर खेरीच्या (lakhimpur kheri) चमरुआ गावात राहणारा अमित तिच्या गर्लफ्रेंडसोबत जवळपास 3 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचा. तो अंबालामध्ये नोकरी करायचा. आता 30 मे 2023 रोजी तो अंबालाहून आपल्या गावी परतला होता. अमित हा खुप जास्त दारू प्यायचा. त्यामुळे त्याचे दररोज लिव्ह इन पार्टनर सोबत भांडण व्हायचे. याच सततच्या भांड़णामुळे आणि अमितच्या वागण्याला कंटाळून तरूणीने अमितचा गळा दाबून हत्या केली होती. या हत्येनंतर त्याचा मृतदेह घराच्या मागच्या शेतात फेकुन दिला होता.दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अमितच्या गर्लफ्रेंड रिंकीला अटक केली आहे. रिंकीने देखील अमितची हत्या केल्याचा कबुलनामा दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

1 जुनला फऱधाना पोलिस ठाण्याला एका तरूणाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणात तपास केल्यानंतर तरूणाची हत्या त्याच्याच गर्लफ्रेंडने केल्याची माहिती उघड झाली होती. सध्या या आरोपी गर्लफ्रेंडला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती लखीमपुर खेरी जिल्ह्याचे एसपी नैपाल सिंह यांनी दिली आहे.

हे ही वाचा :  पळून जाताना नवरीसोबत प्रियकराला ग्रामस्थांनी पकडलं, मग नवऱ्याने…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT