कपूर परिवारात गुड न्यूज! सोनम कपूरने दिला गोंडस बाळाला जन्म; अनिल कपूर झाला आजोबा
अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने एका मुलाला जन्म दिला आहे. संपूर्ण घर मुलाच्या आगमनाचा आनंद साजरा करत आहे. अभिनेत्री नीतू कपूरने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. नीतू कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचे अभिनंदन केले आहे. नितू अहुजा यांच्या […]
ADVERTISEMENT
अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने एका मुलाला जन्म दिला आहे. संपूर्ण घर मुलाच्या आगमनाचा आनंद साजरा करत आहे. अभिनेत्री नीतू कपूरने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. नीतू कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचे अभिनंदन केले आहे. नितू अहुजा यांच्या पोस्टवर सोनम कपूरच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या.
ADVERTISEMENT
नीतू कपूरने सोनम कपूरच्यावतीने शेअर केली पोस्ट
चाहत्यांना आनंदाची बातमी देताना नीतू कपूरने सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्यावतीने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असं लिहलं आहे की, 20 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही एका सुंदर मुलाचं स्वागत केलं आहे. या प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल डॉक्टर, मित्र, परिचारिका आणि कुटुंबीयांचे खूप खूप आभार. ही फक्त सुरुवात आहे, परंतु आम्हाला माहित आहे की, आमचे जीवन कायमचे बदलले आहे. या पोस्टच्या खाली सोनम आणि आनंद असं लिहलं आहे.
आजोबा अनिल कपूरची पोस्ट
नीतू कपूरने अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांचे अभिनंदन केले. दोघेही सोनम कपूरचे आई-वडील आहेत. अनिल कपूर देखील छोट्या पाहुण्याच्या आगमनाने खूप उत्साहित आहे. आणखी एक पोस्ट शेअर करत त्याने लिहिले, “बेबी निरोगी आहे. सोनम आणि आनंदने त्याचं स्वागत केलं आहे. आमचं त्याच्यावर फक्त आणि फक्त प्रेम आहे. नवीन पालकांचे खूप खूप अभिनंदन.” अशा शुभेच्छा देणारी पोस्ट अनिल कपूरने केली आहे.
हे वाचलं का?
कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण
कपूर कुटुंबात ही वेळ फक्त सेलिब्रेशनची आहे. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांना चाहतेही कमेंट करून शुभेच्छा देत आहेत. इतकंच नाही तर सोनम कपूरने मुलाला जन्म दिल्यानंतर इंडस्ट्रीतील सर्व सेलिब्रिटी बाळाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. रेड हार्ट इमोजी पोस्ट करत आहे. अनिल कपूरशिवाय रिया कपूर, फराह खानसह अनेक सेलिब्रिटींनी ही पोस्ट शेअर केली आहे.
लग्नानंतर पतीसोबत सोनम लंडनमध्ये स्थायिक
सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती आनंदसोबत लंडनमध्ये राहत होती. ती प्रसूतीसाठी भारतात आली होती. सोनम आणि आनंद आहुजाने प्रेग्नेंसीच्या टप्प्यात असताना स्वतःचा ब्रँड लॉन्च केला होता. ज्यामध्ये सोनम बेबी बंप दाखवताना दिसली होती. चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला होता. फोटोही खूप व्हायरल झाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT