Operation Sindoor: कसाबने जिथे माणसं मारण्याचं प्रशिक्षण घेतलेलं तेच भारताने उडवलं, Video Viral

मुंबई तक

Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 ठिकाणांवर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर हल्ल्यात अजमल कसाबचं प्रशिक्षण केंद्र ध्वस्त करण्यात आलंय. 

ADVERTISEMENT

कसाबचं प्रशिक्षण केंद्र ध्वस्त
कसाबचं प्रशिक्षण केंद्र ध्वस्त
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दहशतवादी अजमल कसाबनं प्रशिक्षण घेतलेलं सेंटर ध्वस्त करण्यात आलंय. 

point

काश्मीरमधील झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतानं पाकड्यांना चांगलंच असमान दाखवलंय. 

point

पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 ठिकाणांवर हल्ला केला.

Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतानं पाकड्यांना चांगलंच असमान दाखवलंय. 7 मे 2025 रोजी मंगळवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 ठिकाणांवर हल्ला केला. ज्यात 26/11 च्या बॉम्बस्फोटातील दहशतवादी अजमल कसाबनं प्रशिक्षण घेतलेलं सेंटर ध्वस्त करण्यात आलंय.  या हल्ल्यात एकूण 90 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. याचे काही व्हिडिओज् आता समोर येत आहेत.

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं 'इट का जवाब पत्थरसे' ही म्हण सत्यात उतरवली. ज्या महिलांचे पती पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी कायमचे सोडून गेले. ज्यामुळं महिलांचं कुंकू पुसलं गेलं, त्यांना हे समर्पित करण्यात आलंय. त्यामुळंच या प्रकरणाला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलंय. 

हेही वाचा : 450 किमीची रेंज, बंकर्सही फोडतं... एअर स्ट्राईकमध्ये भारताने वापरलेलं स्काल्प आणि हॅमर शस्त्र कसं काम करतं?

हे वाचलं का?

    follow whatsapp