रुग्णांना दिलासा ! Corona उपचारांचे दर कमी होणार, सरकारकडून नवे दर जाहीर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रात अनेक खासगी रुग्णालयांकडून वारेमाप खर्च उकळला जात असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या प्रकारावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कोरोनावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे दर निश्चीत केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील अधिसुचनेला मंजुरी दिली असून शहरांचं वर्गीकरण करुन दर निश्चीत केले जाणार आहेत. यानंतर निश्चीत झालेल्या दरांशिवाय अधिक […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रात अनेक खासगी रुग्णालयांकडून वारेमाप खर्च उकळला जात असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या प्रकारावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कोरोनावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे दर निश्चीत केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील अधिसुचनेला मंजुरी दिली असून शहरांचं वर्गीकरण करुन दर निश्चीत केले जाणार आहेत. यानंतर निश्चीत झालेल्या दरांशिवाय अधिक दर रुग्णालयाला आकारता येणार नाहीये.
सरकारी नियमांचं पालन व्हावं यासाठी स्थानिक जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना निर्देश देण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातली घोषणा केली. सरकारने दिलेल्या प्रस्तावात प्रत्येक शहरासाठी दर्जानुसार वर्गीकर होऊन दर आकारले जाऊ शकतात. अ, ब, क अशा तीन गटात वर्गीकरण करुन दरनिश्चीती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जनतेला याचा फायदा होईल असं मत टोपेंनी व्यक्त केलं.
कोविड रुग्णांकडून आता किती दर आकारले जाऊ शकतात?
-
अ वर्गातील शहरांसाठी ४ हजार रुपये, ब वर्गातील शहरांसाठी ३ हजार रुपये आणि क वर्गातील शहरांसाठी २ हजार ४०० रुपये असे दर आता आताकरण्यात येणार आहेत. या खर्चात देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधं, बेड्सचा खर्च, जेवण याचा समावेश आहे.