Gopichand Padalkar: ‘तर त्यांची सुंता झाली असती’, पवारांवर टीका; पडळकरांनी सोडली पातळी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Gopichand Padalkar left level while criticizing Ajit Pawar: पुणे: ‘जर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसते जे कोणी म्हणत असेल तर त्यांची कदाचित सुंता झाली असती.’ असेल अशी पातळी सोडून टीका आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना पडळकरांनी अजित पवारांचं (Ajit Pawar) नाव न घेता त्यांच्यावर ही जहरी टीका केली आहे. पुण्यातील (Pune) या भाषणात पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी धर्मवीरचा (Dharmaveer) वाद उकरून काढला आहे. पुण्यातील कार्यक्रमात पडळकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (gopichand padalkar left the level while criticizing ajit pawar on issue of dharmaveer)

ADVERTISEMENT

गोपीचंद पडळकरांनी नेमकी काय केली टीका?

‘आज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी काही लोकं चुकीचं बोलतायेत. धर्मवीर संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं बोलतायेत. आपल्या सगळ्यांना इतिहास माहित आहे. धर्मवीर संभाजी महाराजांसोबत कशा चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला. त्यांना धर्म बदलण्यासाठी किती त्रास दिला. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलला नाही.’

‘संभाजी महाराज हे धर्मवीर नसते.. जे कोणी म्हणतायेत संभाजी महाराज धर्मवीर नव्हते त्यांची कदाचित सुंता झाली असती. जर त्यांना तसं वाटत असेल तर मीडियाला माझी विनंती आहे की, त्यांना जाऊन चेक करा. काय परिस्थिती आहे त्यांची. ही परिस्थिती झाली असती की नसती ते सांगा.’ अशा जहरी शब्दात गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.

हे वाचलं का?

‘धर्मवीर’चा नेमका वाद काय?

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातील भाषणात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीरच्या मुद्द्यावर सभागृहात भाष्य केलं होतं. पाहा तेव्हा अजित पवार नेमकं काय म्हणाले होते.

ADVERTISEMENT

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राच्या धर्तीवर 26 डिसेंबर रोजी महाराष्ट्राती वीर बाल दिवसची घोषणा केली. या घोषणेवर अजित पवार यांनी शिंदे यांचं अभिनंदन केलं. मात्र त्याचवेळी राज्यातील ‘बाल शौर्य पुरस्कार’चीही आठवण करुन दिली.’

ADVERTISEMENT

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर? हजारो नेटकरी म्हणतात..

‘बाल शौर्य पुरस्कार’ हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. या पुरस्काराची घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. त्या मंत्रिमंडळामध्ये आपणही होता’

‘मी पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती संभाजी महाराज यांना आपण जाणीवपूर्वक स्वराज्यरक्षक म्हणतो. ते स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. पण, काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात, मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा.’ असं अजित पवार म्हणाले होते.

Ajit Pawar: अजित पवार पुन्हा तेच म्हणाले, ‘संभाजीराजे धर्मवीर नाहीच..’

अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन बराच गदारोळ झाला होता. भाजपने त्यांच्याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी जोडे मारो आंदोलन देखील केलं होतं. त्यानंतर स्वत: शरद पवारांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन या वादावर पडदा टाकण्याचं काम केलं होतं.

मात्र, आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा हा वाद उकरून काढला आहे. त्यामुळे आता अजित पवार त्यांच्या या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT