मराठा आरक्षणावर 6 जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करा अन्यथा… संभाजीराजेंचा सरकारला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठा आरक्षणाबाबत 6 जून पर्यंत भूमिका स्पष्ट करा अन्यथा 7जूनला रायगडावरून मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे असं आज संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं. आम्हाला कुणाच्याही भांडणाशी घेणंदेणं नाही आमच्या समाजाला न्याय द्या. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन मी बोलत नाही. मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

संभाजी राजे यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे पत्रकार परिषदेत मांडले

रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यासाठी 4 तारीख आहे, पण कोव्हिडमुळे ती पुढे गेली आहे. रिव्ह्यू पिटिशन लोकांना दाखवण्यासाठी फाईल करू नका तर फुलप्रुफ असावा हा पहिला पर्याय

हे वाचलं का?

दुसरा पर्याय क्युरेटिव्ह पिटिशन करणं हा आहे

तिसरा पर्याय 342 A नुसार राज्यपालांकडे प्रस्ताव जाईल तो पुढे राष्ट्रपती आणि त्यानंतर संसदेकडे जाईल

ADVERTISEMENT

संभाजीराजे छत्रपती यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. यानंतर आयोजित झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणाले संभाजीराजे?

1917 ला शाहू महाराज म्हणाले की मी मराठ्यांचं नेतृत्व करत नाही तर मी शिपाई म्हणून नेतृत्व करायला आलो आहे. आता आपण सामाजिक मागस राहिलेलो नाही. ऑगस्ट 2017 मध्ये मी आझाद मैदानावर स्टेजवर गेलो आणि भूमिका घेतली कारण त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होणार होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला तो सर्वोच्च होता. मी त्यावेळी भूमिका घेतली माझ्यावर टीका झाली. भांडण करण्यात देणंघेणं नाही आम्हाला न्याय पाहिजे. समाजाला वेठीला धरू नका असंही संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी मी उद्याही राजीनामा देण्यास तयार: खा. संभाजीराजे

मला सगळ्या मराठा समाजाला सांगायचंय की न्यायमूर्ती गायकवाडांचा अहवाल अवैध ठरला आहे. आपला कायदा रद्द झाला आहे. आपण एसईबीसीमध्ये मोडत नाहीत. आपण सामाजिक मागास राहिलो नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला फॉरवर्ड क्लास, डॉमिनेटिंग क्लास असं म्हटलंय. आपण त्याला आव्हान देऊ शकत नाही. आम्ही दु:खी झालो. तेव्हा मी म्हणालो की उद्रेक कुणी करू नका, करोनाचं संकट समोर आहे. आपण जगलो तर लढू शकतो. अनेकांना वाटलं की संभाजी छत्रपतींची ही मवाळ भूमिका का? म्हणून मला सांगायचंय की छत्रपतींच्या घरात माझा जन्म झाला म्हणून मी तशी भूमिका घेतली. पण लगेच दोन दिवसांत दोन्ही पक्षांकडून आरोप सुरू झाले. सत्ताधारी म्हणतात पूर्वीचा कायदा योग्य नव्हता. विरोधी पक्ष म्हणतो यांनी बाजू नीट मांडली नाही म्हणून आमचं नुकसान झालं. पण समाजाला तुमच्या भांडणात रस नाही. आमचं एकच मागणं आहे की मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. तुम्ही लोकांना वेठीला धरू नका. माध्यासकट सर्व खासदार, आमदार मंत्र्यांनी समाजाला काय दिलं’, असं संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षणाचं नेमकं काय होणार? वाचा अशोक चव्हाण यांनी काय दिलं उत्तर…

खासदार-आमदारांची जबाबदारी आहे. म्हणून मी त्या दिवशी नाशिकमध्ये आक्रमक झालो. मी अस्वस्थ झालो आहे. हे सत्ताधारी आणि विरोधक असे कसे वागायला लागलेत? समाजाला न्याय द्या ही माझी भूमिका होती. म्हणून आम्ही महाराष्ट्राचा दौरा केला. कायदेतज्ज्ञांना भेटलो, अभ्यासकांनाही भेटलो. भावना समजू घेतल्या. याप्रसंगी मराठा समाजातले लोकं इतके दु:खी आणि अस्वस्थ आहेत. वेळप्रसंगी कायदा हातात घेतील अशी अवस्था आहे. पण माझ्यामुळे सगळे शांत आहेत. आम्हालाही आक्रमक होता येतं. पण ही वेळ आहे का आक्रमक व्हायची? किती वर्ष आपण या वर्गाचा वापर करायचा? मराठा समाजातला ३० टक्के वर्ग कधीच रस्त्यावर येत नाही. फक्त ७० टक्के गरीब वर्ग रस्त्यावर येत असतो. पण यापुढे आम्ही कुणीच हे चालून देणार नाही असं म्हणत संभाजी राजे यांनी त्यांची आक्रमक भूमिका स्पष्ट केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT