इतक्या महागाईनंतरही लोकं भाजप जिंदाबाद म्हणत असतील तर… – हरिश रावतांची हताश प्रतिक्रीया
पंजाबचा अपवाग वगळून चारही राज्यांत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भाजपने काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये भाजप सरकार स्थापन करणार आहे. सरकार स्थापनेसाठी आवश्यक असणारा बहुमताचा 36 चा आकडा भाजपने सहज पार केला आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 2017 नंतर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत हरिश रावत […]
ADVERTISEMENT

पंजाबचा अपवाग वगळून चारही राज्यांत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भाजपने काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये भाजप सरकार स्थापन करणार आहे. सरकार स्थापनेसाठी आवश्यक असणारा बहुमताचा 36 चा आकडा भाजपने सहज पार केला आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
2017 नंतर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत हरिश रावत पराभूत झाले आहेत. लालकुवा विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मोहन सिंग बिश्त यांनी हरिश रावत यांचा 14 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
पंजाबमध्ये झटका; उत्तर प्रदेशात सुपडा साफ; काँग्रेस करणार आत्मचिंतन
या पराभवानंतर हरिश रावत यांनी हताश प्रतिक्रीया दिली आहे. “आमची निवडणूक प्रचार रणनिती अपुरी ठरली आणि प्रचार समितीचा प्रमुख म्हणून मी ही जबाबदारी स्विकारतो. कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि मी त्यासाठी त्यांचं अभिनंदन करेन. मी लोकांचा विश्वास जिंकू शकलो असतो पण…काँग्रेसचे जे उमेदवार जिंकले त्यांचं आणि माझ्या मुलीचं मी अभिनंदन करतो.”