मिशन बारामतीला जोडून हर्षवर्धन पाटलांची 2024 ची तयारी? सीतारामन यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इंदापूर : भाजपचे लोकसभा निवडणुकीसाठी मिशन बारामती सुरु असतानाच त्याला जोडून इंदापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी इंदापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

ADVERTISEMENT

भाजपच्या ‘मिशन लोकसभा 2024’ अंतर्गत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. 22 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या दौऱ्यात खडकवासला भोर, पुरंदर, बारामती या मतदारसंघाना भेटी देऊन शेवटच्या दिवशीच्या दौऱ्यासाठी शुक्रवारी त्या इंदापुरमध्ये पोहचल्या. रात्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी मुक्काम झाल्यानंतर आज सकाळी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरमध्ये बाईक रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले. यामध्ये युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. क्रेनच्या सहाय्याने फुलांचा हार घालून सीतारामन यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या बाईक रॅलीच्या शक्तिप्रदर्शनाची सध्या इंदापुरमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच यातून पाटील यांनी 2024 साठी सीतारमन यांच्यापुढे आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला असल्याचीही चर्चा आहे.

हे वाचलं का?

2024 च्या विधनासभेला हर्षवर्धन पाटीलच भाजपचे उमेदवार?

हर्षवर्धन पाटील हे मुळचे काँग्रेसी. 1995 साली पहिल्यांदा ते अपक्ष निवडून आले. त्याचवेळी ते पहिल्यांदा मंत्री देखील बनले. त्यानंतर 1999 आणि 2004 या काळात ते विलासराव देशमुख आणि काँग्रेससोबत राहिले. 2009 साली ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती तुटल्यानंतर राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला.

पुढे 2019 मध्ये आघाडीच्या जागावाटपात इंदापूर मतदारसंंघ काँग्रेसला मिळाला नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र यावेळीही त्यांना भरणे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर मागील 3 वर्षांत पाटील भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यामुळे 2024 मध्येही तेच भाजपचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT