नगर-आष्टी दरम्यान हायस्पीड रेल्वेची चाचणी, बीडवासियांचं वर्षांपासूनचं स्वप्न होणार पूर्ण
बीड जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प लवकरच पूर्णत्वाकडे जाण्याच्या मार्गावर आहे. आज नगर ते आष्टीदरम्यान हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली. बीड जिल्ह्याचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून जिल्ह्यात रेल्वेमार्गाचा प्रश्न प्रलंबित होता. अहमदनगर रेल्वे स्थानक ते आष्टीपर्यंत चाचणीच्या निमित्ताने रेल्वेचे प्रथमच बीड जिल्ह्यात आगमन झाले, यावेळी आष्टी रेल्वे स्थानकावर मुंडे […]
ADVERTISEMENT

बीड जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प लवकरच पूर्णत्वाकडे जाण्याच्या मार्गावर आहे. आज नगर ते आष्टीदरम्यान हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली. बीड जिल्ह्याचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून जिल्ह्यात रेल्वेमार्गाचा प्रश्न प्रलंबित होता. अहमदनगर रेल्वे स्थानक ते आष्टीपर्यंत चाचणीच्या निमित्ताने रेल्वेचे प्रथमच बीड जिल्ह्यात आगमन झाले, यावेळी आष्टी रेल्वे स्थानकावर मुंडे समर्थकांनी या रेल्वेचं जोरदार स्वागत केलं.
बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी या रेल्वेचं स्वागत केलं. यादरम्यान मुंडे समर्थकांनी गोपीनाथ मुंडेंच्या नावाने घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या जलदगतीने सुरू आहे. नगर ते आष्टी दरम्यान लोहमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली. बीड जिल्ह्यासाठी हा क्षण अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांनी दिली.यावेळी आमदार सुरेश धस जिल्ह्यातील अन्य महत्वाचे नेते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.