पतीकडून दुसऱ्या कोणत्याही महिलेला मुले होऊ नयेत… म्हणून पत्नीने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एका महिलेने सोशल मीडियावर एक विचित्र इच्छा शेअर केली आहे. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी महिलेला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. ही महिला दोन मुलांची आई आहे. आता तिची अशी इच्छा आहे की, तिच्या नवऱ्याने नसबंदी (Vasectomy) करावी अशी तिची इच्छा आहे. जेणेकरून तिचा पतीपासून घटस्फोट (Divorce) झाला तरी तिच्या पतीपासून इतर कोणत्याही महिलेला मुल होऊ शकणार नाही. दरम्यान, पत्नीचा हा हट्ट देखील पतीने पुरवला आहे.

ADVERTISEMENT

‘द सन’च्या वृत्तानुसार, महिलेने तिचा छोटा व्हिडिओ टिकटॉकवर (Tiktok) शेअर केला आहे. निकोल असे या मुलीचे नाव आहे. व्हिडिओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, ‘लोकांना वाटते की मी चुकीची आहे कारण मला माझ्या पतीची मुले इतर कोणत्याही महिलेसोबत नको आहेत. आता आम्ही तिसर्‍या मुलाला जन्म दिल्यानंतर पती त्याची नसबंदी करून घेणार आहे.’ असं महिलेने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

तिच्या या व्हिडिओवर यूजर्सनी तिला प्रचंड ट्रोल केले आहे. त्याचबरोबर त्याच्या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘जर एखाद्या महिलेने स्वत:ची फसवणूक केली तर ती स्वत: घटस्फोट घेते, अशा परिस्थितीत तिच्या पतीने इतर कोणत्याही महिलेसोबत मुलांना का जन्म देऊ नये? अनेकांनी असे लिहिले आहे की, जर एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीबद्दल असेच सांगितले असते, तर महिला म्हणाल्या असत्या की, ‘माझं शरीर, माझी निवड’

हे वाचलं का?

दरम्यान, एका व्यक्तीने आश्चर्य व्यक्त केले आणि अशी टिप्पणी केली की, ‘प्रत्येकजण इतका वेडा असू शकत नाही’, ज्यावर निकोलने असे उत्तर दिले की, ‘जर तुमचा एखाद्या गोष्टीवर विश्वास नसेल तर याचा अर्थ असा नाही की ती एक वेडी कल्पना आहे.’

त्याचवेळी आणखी एका व्यक्तीने कमेंट करताना असं म्हटलं की, ‘खरं तर लोकांना दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण का ठेवायचे आहे?’ तर आणखी एका युजरने असेही लिहिले की, ‘मी हे दाव्याने म्हणू शकतो की तो (महिलेचा पती) सहमत असेल कारण ती महिला त्याला सोडून जाऊ नये असंच त्याला वाटत असेल.’ या कमेंटला निकोलनेही उत्तर दिले. तिने सांगितले की, ‘तिच्या पतीने केवळ तिच्या आनंदासाठी ही गोष्ट करण्यास तयारी दर्शवली आहे आणि यामुळे आमचे कुटुंब देखील सुखी होईल.’

ADVERTISEMENT

1975 Emergency आणि नसबंदीचा निर्णय हे एकमेकांमध्ये कसे मिसळले गेले?

ADVERTISEMENT

दरम्यान, या सगळ्या प्रकरणाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच अनेक जण आपली वेगवेगळी मतं देखील यावेळी व्यक्त करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT