महाराष्ट्रात Lockdown सुरू झाल्यापासून किती रूग्ण वाढले आणि किती बरे झाले? जाणून घ्या
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पॉझिटिव्ह होणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वात जास्त फटका देशात महाराष्ट्राला बसला आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता, लस तुटवडा या सगळ्यांनाही महाराष्ट्र सामोरा जातोच आहे. अशात महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 14 एप्रिल ते 1 मे या कालावधीसाठी हा लॉकडाऊन […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पॉझिटिव्ह होणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वात जास्त फटका देशात महाराष्ट्राला बसला आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता, लस तुटवडा या सगळ्यांनाही महाराष्ट्र सामोरा जातोच आहे. अशात महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 14 एप्रिल ते 1 मे या कालावधीसाठी हा लॉकडाऊन आहे. आता आपण जाणून घेऊया की या लॉकडाऊनचा काही फायदा झाला आहे का?
ADVERTISEMENT
Corona संक्रमणाची साखळी कशी तोडता येईल? दुसरी लाट कधी संपेल?
14 ते 27 एप्रिल या 14 दिवसांच्या कालावधीत किती रूग्ण बरे झाले आणि किती रूग्ण पॉझिटिव्ह झाले जाणून घेऊया
हे वाचलं का?
14 एप्रिल 58 हजार 952 पॉझिटिव्ह रूग्ण
39 हजार 624 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
ADVERTISEMENT
15 एप्रिल 61 हजार 695 पॉझिटिव्ह रूग्ण
ADVERTISEMENT
53 हजार 335 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
16 एप्रिल 63 हजार 729 पॉझिटिव्ह रूग्ण
45 हजार 335 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
17 एप्रिल 67 हजार 123 पॉझिटिव्ह रूग्ण
56 हजार 783 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
18 एप्रिल 68 हजार 654 पॉझिटिव्ह रूग्ण
45 हजार 654 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
19 एप्रिल 58 हजार 924 पॉझिटिव्ह रूग्ण
52 हजार 412 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
20 एप्रिल 62 हजार 97 पॉझिटिव्ह रूग्ण
54 हजार 224 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
21 एप्रिल 67 हजार 468 पॉझिटिव्ह रूग्ण
54 हजार 985 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
22 एप्रिल 67 हजार 13 पॉझिटिव्ह रूग्ण
62 हजार 298 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
23 एप्रिल 66 हजार 836 पॉझिटिव्ह रूग्ण
74 हजार 45 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
24 एप्रिल 67 हजार 160 पॉझिटिव्ह रूग्ण
63 हजार 818 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
25 एप्रिल 66 हजार 191 पॉझिटिव्ह रूग्ण
61 हजार 450 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
26 एप्रिल 48 हजार 700 पॉझिटिव्ह रूग्ण
71 हजार 736 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
27 एप्रिल 66 हजार 358 पॉझिटिव्ह रूग्ण
67 हजार 752 रूग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
Record! महाराष्ट्रात एका दिवसात 5 लाखांपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण
लॉकडाऊन लागल्यापासून म्हणजेच 14 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीमध्ये महाराष्ट्रात 8 लाख 90 हजार 900 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 8 लाख 3 हजार 451 रूग्ण याच कालावधीत कोरोनातून बरे झाले आहेत. असं असलं तरीही महाराष्ट्रातील रूग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊनच्या चौद दिवसांमध्ये 26 एप्रिल आणि 23 एप्रिल या दोन दिवसांचा अपवाद सोडला तर बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या ही पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येपेक्षा कमीच आहे.
मुंबईत गेल्या आठ दिवसांमध्ये रूग्णसंख्येत घट होते आहे. 3 एप्रिलला मुंबईतली एका दिवसातली रूग्णसंख्या ही 11 हजारांवर गेली होती. ती आता 5 ते 6 हजारांवर म्हणजे जवळपास निम्म्यावर येऊन पोहचली आहे. मात्र महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये असं चित्र नाही. महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये काय स्थिती आहे याचा आपण अॅक्टिव्ह रूग्णसंख्येवरून अंदाज घेऊ.
14 एप्रिल अॅक्टिव्ह रूग्ण
मुंबई- 86 हजार 635
ठाणे- 84 हजार 98
पुणे – 1 लाख 12 हजार 414
सोलापूर- 10 हजार 231
नाशिक -44 हजार 880
औरंगाबाद-14 हजार 680
नागपूर-65 हजार 368
चंद्रपूर- 7 हजार 898
गोंदिया-6 हजार 536
21 एप्रिल
मुंबई- 83 हजार 540
ठाणे- 78 हजार 473
पुणे – 1 लाख 21 हजार 284
सोलापूर- 12 हजार 867
नाशिक -46 हजार 253
औरंगाबाद-15 हजार 206
नागपूर-80 हजार 155
चंद्रपूर- 17 हजार 122
गोंदिया-10 हजार 244
27 एप्रिल
मुंबई – 68 हजार 603
ठाणे- 72 हजार 302
पुणे – 1 लाख 04 हजार 561
सोलापूर- 15 हजार 103
नाशिक -51 हजार 061
औरंगाबाद-13 हजार 993
नागपूर-75 हजार 219
चंद्रपूर- 25 हजार 320
महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांमधल्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या पाहिली तर लक्षात येतं की मुंबई, ठाण्यात केसेस कमी झाल्या आहेत आणि इतर जिल्ह्यांमध्ये वाढल्या आहेत. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे हेच ही संख्या सांगते आहे.
लॉकडाऊनबाबत काय?
महाराष्ट्रात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. तरीही रूग्णसंख्या कमी होताना दिसत नाहीये. सातत्याने 65 हजार ते 67 हजारांच्या दरम्यान रूग्ण आढळत आहेत. गेल्या 14 दिवसांच्या कालावधीत 26 एप्रिलला 48 हजार 700 केसेस आढळल्या. महाराष्ट्रात लॉकडाऊन आणखी वाढेल का हा प्रश्न मुंबई तकने जेव्हा टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांना विचारलं असता महाराष्ट्रात आणखी किमान 15 दिवस वाढ आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपेही यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत 30 एप्रिलला निर्णय घेतील असं सांगितलं आहे. मात्र त्यांनीही लॉकडाऊन वाढू शकतो असे संकेत दिले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT