HSC Exam 2023: 12वीचा ‘हा’ पेपर फुटला, अजित पवार विधानसभेत भडकले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

HSC Exam Paper Leak 2023 : राज्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची (HSC Exam) परीक्षा सूरू आहे. या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी तयारी केली आहे. या परीक्षेदरम्यानच एक मोठी बातमी समोर आली आहे. बारावीचा गणिताचा (Maths Paper) पेपर फुटल्याची घटना घडली आहे. परीक्षेआधीच हा पेपर फुटल्याने एकच गोंधळ उडाला असून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले आहेत. राज्यात बोर्डाच्या परीक्षेदरम्यान घडलेल्या या घटनेवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. (hsc exam pepers leaked maths paper photo viral in social media sindkhed raja buldhana)

ADVERTISEMENT

‘या’ जिल्ह्यात घडला प्रकार

बारावीच्या (HSC Exam) इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तर छापून आल्याची घटना ताजी असताना आता गणिताचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. परीक्षेच्या अर्धा तास आधी गणिताचा (Maths Paper) पेपर फुटल्याची घटना घडली आहे. बुलढाण्याच्या (Buldhana) सिंदखेडराजामधील एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार घड़लाय. परीक्षा सुरू झाल्यानंतर हा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला होता.

Sanjay Raut Controversy: ”मी त्यांना चोरमंडळ म्हटलं…”, संजय राऊतांच स्पष्टीकरण

हे वाचलं का?

बारावीचा गणिताचा (Maths Paper) पेपर 11 वाजता सुरु होणार होता.मात्र पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजे 10.30 वाजल्याच्या सुमारास बुलढाण्याच्या (Buldhana) सिंदखेडराजात पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पेपर फूटीच्या या घटनेने एकच खळबळ माजली होती. एकिकडे परीक्षा केंद्रावर मोबाईलला बंदी असताना देखील पेपर सोशल मीडियावर व्हायरल झालाच कसा? परीक्षा केंद्रावर कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा पेपर फुटला कसा?असा सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. या घटनेने एकच गोंधळ उडाली आहे.

विधानसभेत गदारोळ

बुलढाण्यातील पेपरफूटीचे पडसाद विधानसभेतही उमटले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी परिक्षेमध्ये कॉपीचे सर्रास प्रकार सुरू आहेत. शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे. त्यासाठी कडक नियमावली देखील केली आहे. मात्र या अभियानाचा फज्जा उडतोय असंच या पेपरफुटीवरुन समोर आल्याचे अजित पवार यांनी विधानसभेत म्हटलंय.

ADVERTISEMENT

कसब्यात BJPचा ‘करेक्ट कार्यक्रम’ नेमका केला तरी कोणी?, वाचा इंटरेस्टिंग माहिती

ADVERTISEMENT

दरम्यान याआधी देखील यवतमाळमध्ये इंग्रजी (English Paper) विषयाचा पेपर फुटला होता. इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाण्यातील पेपर फुटीला अद्याप बोर्डाने दुजोरा दिला नाही आहे. मात्र पेपर व्हायरल करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. आता या प्रकरणात नेमकं किती जणांना अटक करण्यात येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT