BEED: ‘बायकोचा खून करून आलोय’, हत्येनंतर पती स्वत: गेला पोलिसात अन्..
BEED Wife Murder: बीड: बीड (Beed) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. चक्क नवऱ्याने (Husband) बायकोच्या (Wife) गळा आणि छातीवर धारदार कुऱ्हाडीचे वार करून खून (Murder) केल्याची घटना आज (7 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास घडली असून या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. (husband kills wife with axe himhself goes to police station and appears shocking incident in […]
ADVERTISEMENT
BEED Wife Murder: बीड: बीड (Beed) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. चक्क नवऱ्याने (Husband) बायकोच्या (Wife) गळा आणि छातीवर धारदार कुऱ्हाडीचे वार करून खून (Murder) केल्याची घटना आज (7 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास घडली असून या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. (husband kills wife with axe himhself goes to police station and appears shocking incident in beed)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
केज तालुक्यातील ढाकेफळ येथील चौसा वस्ती नावाने ओळखल्या जात असलेल्या वस्तीवर मंगळवार रोजी (7 फेब्रुवारी) रोजी दुपारी 3.20 वाजता भगवान शाहूंराव थोरात (वय 33 वर्ष) याने त्याची पत्नी आरती भगवान थोरात (वय 27 वर्ष) हिच्यावर धारदार कुऱ्हाडीने वार करत तिची निर्घृण हत्या केली. आरोपी पतीने गळा आणि छातीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा हत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना घडली त्यावेळी भगवान याचे आई-वडील हे एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेले होते.
आरती व भगवान थोरात यांची दोन्ही मुले स्वराज आणि विराज हे केज येथील शाळेत गेले होते. आरोपी भगवान हा केज येथील सरकारी दवाखान्याजवळ त्याचे एक ट्रॅक्टर दुरुस्तीचे गॅरेज चालवत होता.
हे वाचलं का?
Crime : पुतण्याचे काकीशी अनैतिक संबंध अन् हत्या, ‘असा’ झाला भांडाफोड!
सकाळी भगवान थोरात हा मुलांना केज येथे शाळेत सोडून गेला आणि त्यानंतर त्याने गॅरेजवर येण्याऐवजी तो ढाकेफळ येथे घरी गेला होता. दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घरी कोणी नसल्याचं पाहून त्याने घराच्या बाहेर दरवाजा जवळ पत्नी आरतीचा कुऱ्हाडीने खून केला. दुपारची वेळ असल्याने त्यांच्या घराजवळ कोणीच नव्हते. त्यामुळे आरतीला कोणी मदतही करू शकलं नाही.
ADVERTISEMENT
धक्कादायक बाब म्हणजे.. पत्नीच्या हत्येबाबत आरोपी पतीच्या चेहऱ्यावर किंचितही लवलेश नव्हता. कारण पत्नीची हत्या केल्यानंतर कुऱ्हाड प्रेताजवळच टाकून तो स्वतः युसूफ-वडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. यावेळी स्वत: त्याने पोलीस अधिकाऱ्यांना आपणच पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. अचानक एका व्यक्तीने अशा प्रकारे हत्येची माहिती दिल्यानंतर काही क्षण पोलीसही गोंधळून गेले. मात्र, त्यानंतर त्यांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं.
ADVERTISEMENT
Crime : शेतकरी महिलेची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे; ओलांडली क्रूरतेची सीमा!
दरम्यान, भगवान थोरात याने आपली पत्नी आरती हिची नेमकी हत्या का केली? याचं कारण मात्र, अद्याप समजू शकलेलं नाही. दुसरीकडे खुनाची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि युसूफ-वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे घटनास्थळी दाखल झाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT