धर्मांतर केलं नाही मी हिंदूच, नवाब मलिकांच्या आरोपांना ज्ञानेश्वर वानखेडेंचं पुरावे दाखवत उत्तर

मुंबई तक

मी धर्मांतर केलेलंच नाही असं म्हणत आज ज्ञानेश्वर वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांच्या प्रत्येक आरोपांना उत्तर दिलं आहे. क्रांती रेडकर, ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आज रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यानंतर क्रांती रेडकर, ज्ञानेश्वर वानखेडे आणि रामदास आठवले यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ज्ञानेश्वर वानखेडे यांनी सगळे पुरावे दाखवत नवाब मलिक यांचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मी धर्मांतर केलेलंच नाही असं म्हणत आज ज्ञानेश्वर वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांच्या प्रत्येक आरोपांना उत्तर दिलं आहे. क्रांती रेडकर, ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आज रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यानंतर क्रांती रेडकर, ज्ञानेश्वर वानखेडे आणि रामदास आठवले यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ज्ञानेश्वर वानखेडे यांनी सगळे पुरावे दाखवत नवाब मलिक यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. तसंच यापुढे नवाब मलिक यांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आरोप केले तर मी अब्रू नुकसानीचा दावा करेन असंही ज्ञानेश्वर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले ज्ञानेश्वर वानखेडे?

मी जन्मल्यापासून शाळेच्या दाखल्यापर्यंत एनसीसी आणि सर्व्हिसला लागल्यापासूनचे सर्व कागदपत्रं आमच्याकडे आहेत. मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी महार जातीतील आहे. मी मुस्लिम महिलेशी 1978 मध्ये लग्न केलं आहे. मी हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे. समीर आणि मी कधीही धर्मांतर केलं नाही, असा दावा करतानाच आमच्यावरील खासगी आरोप थांबवा. प्रश्न फक्त ड्रग्जचा आहे. तुमच्या जावयाला अटक केल्यामुळे आम्हाला बदनाम करू नये. तुम्ही कोर्टात जावं आमची बदनामी करू नका, असं त्यांनी सांगितलं.

ज्ञानेश्वर वानखेडे यांनी त्यांचा पासपोर्ट, त्यांचं रेशन कार्ड, लग्नाचं प्रमाणपत्र असे सगळेच कागदपत्र दाखवले. एवढंच नाही तर माझ्या पत्नीनेही तिचं नाव झाहीदा ज्ञानेश्वर वानखेडे असं लावलं आहे याचाही पुरावा ज्ञानेश्वर वानखेडेंनी दाखवला. एवढंच नाही तर आपण निवृत्त झाल्यानंतरही जे सर्टिफिकेट आहे ते देखील दाखवलं. अनेक पुरावे दाखवून त्यांनी नवाब मलिक यांचे सगळे आरोप दाखवले.