Crime: ‘सोन्याचा खजिना सापडलाय’, प्रेयसीला जंगलात नेलं; 35 वेळा भोसकलं
Married Girlfriend Murder: टिटवाळा: लग्नाचा तगादा लावणाऱ्या विवाहित प्रेयसीची (Girlfriend) धारदार हत्याराने 35 वेळा वार करून निर्घृण हत्या (Murder) करणाऱ्या प्रियकराला (Boy Friend) त्याच्या साथीदारासह कल्याण (Kalyan) तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसीशी खोटं बोलून प्रियकराने तिला पुण्याहून टिटवाळ्यात आणलं होतं. जिथे तिची निर्घृण हत्या करण्यात आली. (i found gold treasurei make […]
ADVERTISEMENT

Married Girlfriend Murder: टिटवाळा: लग्नाचा तगादा लावणाऱ्या विवाहित प्रेयसीची (Girlfriend) धारदार हत्याराने 35 वेळा वार करून निर्घृण हत्या (Murder) करणाऱ्या प्रियकराला (Boy Friend) त्याच्या साथीदारासह कल्याण (Kalyan) तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसीशी खोटं बोलून प्रियकराने तिला पुण्याहून टिटवाळ्यात आणलं होतं. जिथे तिची निर्घृण हत्या करण्यात आली. (i found gold treasurei make you a jewel boyfriend brutally killed his girlfriend by taking her to forest)
दरम्यान याप्रकरणी आरोपी जयराम उत्तरेश्वर चौरे या आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे. तर सुरज गोलू धाटे असे हत्येत सहभागी असलेल्या त्याच्या साथीदाराचे नाव असून दोघेही बीड जिल्हाचे रहिवाशी आहे. तर रुपांजली संभाजी जाधव असे मृत प्रेयसीचे नाव आहे.
12 डिसेंबरला रुपांजली हिची हत्या झाली होती. 25 डिसेंबर रोजी टिटवाळा येथील गोवेली जंगल परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेवर धारदार शस्त्राने तब्बल 35 वार करण्यात आले होते. महिलेचे निर्घृण हत्या केलेला मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृत्यदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला होता.
मुंबई : प्रेयसी गावी जाऊन नये म्हणून त्याने घेतला ७ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव