Cyber Crime : जर कुरिअर सर्व्हिसबद्दल गुगलवर सर्च करत असाल तर सावधान!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Cyber crime : मुंबईच्या नागपाडा पोलिसांनी (Mumbai Nagpada police) झारखंडमधील जामतारा (Jamtara) येथून 3 सायबर (Cyber) घोटाळेबाजांना अटक केली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी पकडलेले आरोपी गुगलवर (Google) कुरिअर कंपन्यांच्या बनावट वेबसाईट तयार करून विविध राज्यातील सर्वसामान्यांची फसवणूक करत होते. पोलिसांनी सत्तार अन्सारी, रियाज अन्सारी आणि नजीर अन्सारी नावाच्या तिघांना अटक केली आहे. Maharashtra Police has arrested three people from Jamtara

ADVERTISEMENT

Cyber Crime : ऑनलाईन साईटवरुन टीव्हीचा रिमोट मागवला, तरुणाला बसला ९९ हजार ९९९ रुपयांचा फटका

जेव्हा नागरिक गुगलवर कुरिअरशी संबंधित माहिती शोधतात तेव्हा त्यांना त्या बनावट साइट्सवर उपलब्ध आरोपींचे मोबाइल क्रमांक दिसतात. कॉल केल्यावर, नागरिकांना दुसर्‍या मोबाईल फोनवरून कॉल येईल आणि दुसर्‍या मोबाईल फोनवरून एक लिंक पाठविली जाईल असे सांगण्यात येते आणि कुरिअरची त्वरित आवश्यकता असल्यास, त्यांना त्या लिंकवर क्लिक करून बँक तपशील भरण्यास सांगितले जाते. बँक तपशील आणि त्यांना या लिंकद्वारे 5 रुपये शुल्क भरण्यास सांगतात. नागरिकांच्या बँक खात्याची माहिती मिळाल्यानंतर कोणत्याही डेस्क अॅपद्वारे त्यांच्या खात्यातून रक्कम काढली जाते.

हे वाचलं का?

मुंबईतील तरुणाची कशी झाली फसवणूक?

नागपाडा येथे राहणाऱ्या तक्रारदाराचे एक पार्सल कुरिअरद्वारे येणार होते. एका एजंटने त्याला फोन करून पार्सल तातडीने हवे असल्यास पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. पाठवलेल्या लिंकवर पैसे पाठवताना या तरुणाच्या खात्यातून 95 हजार रुपये डेबिट झाले. ही बाब लक्षात येताच तरुणाने नागपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मोबाईल क्रमांकावरून तांत्रिक माहिती मिळवून गुन्ह्यातील साक्षीदार आरोपींचा ठावठिकाणा शोधून तिघांनाही अटक करण्यात आली.

Crime : पगारवाढ रोखल्याच्या रागातून वरिष्ठाची हत्या… पोलीस दलात खळबळ

ADVERTISEMENT

पोलिसांनी जंगलात केला पाठलाग

झारखंडमधील जामतारा येथे पोलिसांनी या भामट्यांचा जंगलात पाठलाग करून त्यांना पकडले. आरोपींनी मुंबई, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आसामसह संपूर्ण देशात अशा प्रकारे ऑनलाइन फसवणूक केल्याची शक्यता असून, मिळालेल्या मोबाईलच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

सध्या डिजिटल युग आहे. सर्वांकडे आज स्मार्टफोन आले आहे. त्याचसह इंटरनेटचाही वापर सध्या बहुतांश लोक करत आहेत. इंटरनेटचे जितके फायदे तसे तोटे देखील आहेत. सायबर ढगांचे प्रमाण देखील वाढले आहेत. लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कली लढवल्या जात आहेत. झारखंडच्या जामतारा गावात शेकडो तरुण या फसवणुकीच्या धंद्यात उतरले आहेत. त्यांना धडा शिकवण्याचे आव्हान सायबर पोलिसांवर असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT