Rape Case: बीड जिल्हा हादरला, वासनांध 23 वर्षीय तरुणाचा 8 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

मुंबई तक

रोहिदास हातागळे, बीड: बीड जिल्ह्याला हादरून सोडणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. एका 23 वर्षीय वासनांध तरुणाने अवघ्या 8 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. मागील काही दिवसात बीड जिल्ह्यात बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंबाजोगाई तालुक्यामधील डोंगरपिंपळा गावात हा धक्कादायक प्रकार […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, बीड: बीड जिल्ह्याला हादरून सोडणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. एका 23 वर्षीय वासनांध तरुणाने अवघ्या 8 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. मागील काही दिवसात बीड जिल्ह्यात बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अंबाजोगाई तालुक्यामधील डोंगरपिंपळा गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठ वर्षीय चिमुकलीवर 19 मार्च 2022 शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर (वय 23) याने घरासमोर खेळत असलेल्या एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून बळजबरीने तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर त्या निष्पाप चिमुकलीला भयभीत करत हत्या करण्याची धमकी देखील नराधम आरोपीने दिली असल्याचं आता समोर आलं आहे. ही घटना अतिशय संतापजनक असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आता नातेवाईक करत आहेत.

याप्रकरणी मुलीच्या चुलत्याच्या फिर्यादीवरून आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर (वय 23) वर्षे रा.डोंगरपिंपळा ता.अंबाजोगाई याच्या विरोधात कलम 376, 376(2), 376(AB), 506 भादंवि 4, 6 पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp