Navi Mumbai: अभ्यासासाठी तगदा लावल्याने मुलीने कराटेच्या पट्ट्याने केली जन्मदात्या आईची हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

निलेश पाटील, नवी मुंबई

ADVERTISEMENT

अभ्यासाचा तगादा लावण्यावरून झालेल्या भांडणांमध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने (Daughter) आपल्याच जन्मदात्या आईचा (Mother) गळा आवळून हत्या (Murder) केल्याची अत्यंत खळबळजनक घटना नवी मुंबईतील (Navi Mumbai) ऐरोलीमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर मुलीने आईने आत्महत्या केल्याचा कट रचला. परंतु पोलिसांच्या चौकशीअंती सत्य घटना समोर आली आहे.

ऐरोली सेक्टर 7 येथील एका 15 वर्षीय विद्यार्थिनीने आईच्या सततच्या अभ्यासाच्या जाचाला कंटाळून स्वतःच्याच आईची गळा आवळून हत्या केली. 30 जुलै 2021 रोजी दुपारी मुलगी अभ्यास करीत नसल्याने आईने मुलीला रागावून मारहाण केली.

हे वाचलं का?

यावेळी दोघींची झटापट झाली. त्याचवेळी आईने मुलीच्या डाव्या हाताच्या पंजाला चावा घेतल्याने मुलीने आईला जोरात धक्का दिला. यावेळी तिच्या आईच्या डोक्याला बेडच्या कोपरा लागला आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. मात्र तशाही अवस्थेत ती उठण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, त्याचवेळी चिडलेल्या मुलीने आपल्या आईला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बेडवर पडलेल्या कराटेच्या पट्ट्याने गळा आवळून तिची हत्या केली.

दरम्यान, रागाचा भरात केलेलं हे कृत्य मुलीच्या लक्षात येताच तिने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अत्यंत चालाखीने मुलीने आपल्या आईच्या मोबाइलवरून कुटुंबातील प्रमुखांना ‘I Tried of Everything, I Quit’ असा मेसेज केला व बेडरूमची चावी काढून बेडरूममध्येच ठेवून बेडरूम लॅचने लॉक केलं.

ADVERTISEMENT

त्यामुळे आपल्या आईने आत्महत्या केली असल्याचा बनाव मुलीने रचला. त्यामुळे प्रथमदर्शनी रबाळे पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

ADVERTISEMENT

परंतु घटनास्थळी जी परिस्थिती होती ते पाहता पोलिसांना संपूर्ण घटनेबाबत संशय आला आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांची खात्री झाली की, महिलेने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे.

Shocking : नाशिकमध्ये अभ्यास न करणाऱ्या मुलाचा खून करून आईने केली आत्महत्या

यानंतर रबाळे पोलिसांनी घरातील लोकांची चौकशी केली असता मुलीनेच आईची हत्या केल्याचे उघड झाले. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन व त्यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने हे प्रकरण उघडकीस आणले. याबाबत अधिक तपास रबाळे पोलीस करीत असून सध्या अधिक चौकशीसाठी मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT