Pune: गुण वाढवून देण्याचं आमिष, विद्यार्थिंनीकडे शरीरसुखाची मागणी; शिक्षकाची काढली धिंड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. मात्र याच शहरात आज एक लाजिरवाणी घटना घडली आहे. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील तरुणीला गुण वाढवून देतो पण त्यासाठी त्यासाठी विद्यार्थिंनीकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या एका शिक्षकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे.

ADVERTISEMENT

शिक्षकी पेशाला काळं फासणाऱ्या या वासनांध शिक्षकाच्याच तोंडाला काळं फासून त्याची भर रस्त्यातून धिंडही काढण्यात आली. महाविद्यालयापासून ते विश्रामबाग पोलीस स्टेशनपर्यंत संबंधित शिक्षकाची धिंड काढण्यात आली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, आरोपी शिक्षकाचे नाव अभिजीत पवार असल्याचं समजतं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारवाड्याच्या मागील बाजूस असलेल्या महाविद्यालयात बारावीमध्ये शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीला अभिजीत पवार हा शिक्षक गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून शरीर सुखाची मागणी करत होता.

हे वाचलं का?

अनेक वेळा विद्यार्थिनीने त्याला नकार देखील दिला होता. मात्र, आरोपी शिक्षक यासाठी सतत त्रास देतच होता. या प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु होता. त्यावर विद्यार्थिनी त्या दोघांमधील कॉल रेकॉर्ड केला आणि घरी दाखवला.

त्यानंतर आज दुपारच्या सुमारास संबंधित विद्यार्थिनींचे नातेवाईक आणि इतर काही व्यक्तींनी महाविद्यालयात जाऊन शिक्षकाला जाब विचारत चांगलाच चोप दिला. यावेळी त्यांनी त्याच्या तोंडावर शाई देखील फेकली. त्यानंतर महाविद्यालयापासून ते विश्रामबाग पोलीस स्टेशनपर्यंत त्याची धिंड काढली आणि नंतर त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं.

ADVERTISEMENT

एका महाविद्यालयातील विद्यार्थिंनीकडे गुण वाढवून देतो असे आमिष दाखवून शरीर सुखाची मागणी करणार्‍या शिक्षकाला नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये आणले. त्याच्या विरोधात पीडित विद्यार्थ्यांनी तक्रार दिली असून आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

पुण्यात अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार, गोळी झाडून ठार करण्याचाही प्रयत्न

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात 10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेंसह कोणत्याही महत्त्वाच्या परीक्षा झालेल्या नाहीत. अशावेळी दहावी आणि बारावीच्या निकालासाठी अंतर्गत गुण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना किती गुण द्यायचे हे संबंधित शाळा आणि महाविद्यालयांच्या अखत्यारित असणार आहे. याच गोष्टीचा फायदा घेत अभिजित पवार या शिक्षकाने विद्यार्थिनीला गुण वाढवून देण्यासाठी थेट शरीरसुखाची मागणी केली. या प्रकारामुळेच शिक्षकाला विद्यार्थिंनीच्या नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT