IT ने पवार कुटुंबीयांना टार्गेट केलं आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले….

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

ADVERTISEMENT

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. त्याचप्रमाणे पार्थ पवार यांच्या कंपनीवरही छापा टाकण्यात आला. आयकर विभागाने ही कारवाई केली. त्यानंतर आमच्या कुटुंबाला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे असं वक्तव्य शरद पवार आणि अजित पवार यांनी केलं. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. आयकर विभागाने पवार कुटुंबीयांवर छापा टाकला असं म्हणणं चुकीचं ठरेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

हे वाचलं का?

आयकर विभागाने दोन प्रकारचे छापे टाकले त्यातील पहिल्या छाप्यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रक काढलं आहे. यामध्ये मांडण्यात आलेली बाब गंभीर आहे. 1050 कोटींच्या दलालीचा प्रकार महाराष्ट्रात घडल्याचं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भातली कागदपत्रं आणि पुरावे सापडले आहेत. यामध्ये बदल्या, टेंडर, मंत्री आणि अतिकारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशातील सर्वात मोठा पुरावा या छाप्यांमधून समोर आला आहे. आता एजन्सी याबाबत खुलासा करेल तेव्हाच आपल्याला आणखी स्पष्टता येईल. पण प्रकरण गंभीर आहे असं फडणवीस म्हणाले.

त्यानंतर फडणवीस म्हणाले की तक्रारी अशा होत्या या कारखान्यांच्या खरेदीच्या वेळी ज्या कंपन्यांमधून पैसा आला आहे तो योग्य नाही. त्यामुळे त्याची चौकशी आयकर विभागाने केली. या कंपन्यांच्या संचालकांकडे छापेमारी करण्यात आली. हे छापे पवार कुटुंबीयांवर टाकण्यात आले असं म्हणणं चुकीचं ठरेल. पवार कुटुंबात अजूनही लोक आहेत, ते वेगवेगळे व्यवसाय करतात. त्यांच्यावर कुठलाही छापा टाकण्यात आलेला नाही. चार-पाच साखर कारखाने आहेत त्यामध्ये काही चुकीचे व्यवहार झाल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्यामुळे संचालकांवर छापे टाकण्यात आले. याला कोणत्याही कुटुंबाशी जोडणं योग्य नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे, नंतर IT ने दिली खळबळजनक माहिती

ADVERTISEMENT

सगळ्या छाप्यांनंतर पुरावा मिळाल्यानंतर त्याला राजकीय स्वरुप देणं हे चुकीचं आहे. त्यासोबतच काल-परवा ज्या रेड झाल्या आहेत, पाच साखर कारखाने ज्यांच्या विक्री संदर्भात तक्रार होती ज्याची चौकशी झाली, चौकशीमध्ये विक्रीची प्रक्रियाही चुकीची आहे. त्याहीपेक्षा विकत घेताना जे फंड्स आले आहेत ते चुकीच्या पद्धतीने आले आहेत. तुम्ही काळ्या पैशांवर टॅक्स भरुन किंवा लाचेच्या पैशांवर टॅक्स भरुन ते पैसे पांढरे करु शकत नाहीत हा नियम आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस एखादा कारखाना विकत घेता त्यावेळी त्या कारखान्याचा खरेदी पैसा हा योग्य पैसा असला पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT