Sanjay Raut यांच्या अडचणीत वाढ? कथित कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay Raut | Covid Scam :

मुंबई : शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कथित कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने २ जणांना अटक केली आहे. राजीव साळुंखे आणि सुनील कदम अशी अटक झालेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघेही राऊतांचे निकटवर्तीय असल्याचं सांगण्यात येत आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी ऑगस्ट 2022 मध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. (EOW arrested 2 persons in connection with the alleged covid center scam)

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीनेही गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. या प्रकरणात राऊतांना अटकही झाली होती आणि त्यानंतर जामीनही मंजूर झाला आहे. याशिवाय याच कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना नोटीस बजावली होती आणि चौकशीही झाली आहे. दरम्यान आता या प्रकरणात दोन जणांना अटक झाल्याने आता पुढे काय होणार हे पहावं लागणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सत्तासंघर्ष: सरन्यायाधीशांच्या एका प्रश्नाने शिंदेचं वाढलं टेन्शन; सरकारच धोक्यात?

नेमकं प्रकरण काय?

मुंबई महापालिकेकडून कोव्हिड काळात कोव्हिड सेंटर्सची कंत्राटं देण्यात आली होती. त्यातच सुजित पाटकर यांच्या कंपनीला दोन ते तीन कोव्हिड सेंटर चालविण्याची परवानगी देण्यात आली होती. या कोव्हिड सेंटरसाठी जी कंपनी त्यांनी वापरली होती लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट तिची नोंदणी झालेली नव्हती. तरीही त्यांना कंत्राट देण्यात आलं.

ADVERTISEMENT

हे कंत्राट जून 2020 रोजी देण्यात आलं. त्यानंतर एका वर्षानंतर त्यांच्या कंत्राटाचा करार महापालिकेबरोबर पार पडला. सूत्रांच्या माहितीनुसार यामध्ये जो एक वर्षाचा कालावधी होता त्यात 32 ते 35 कोटींचा फंड सुजित पाटकर यांच्या कंपनीला देण्यात आला. मुंबईशिवाय पुण्यातही सुजित पाटकर यांना अशीच कंत्राटं मिळाली होती.

ADVERTISEMENT

याच प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गंभीर आरोप केले होते आणि ते त्यासाठी पुण्यातही गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता. हे प्रकरण वेगळं आहे. पण मुंबईतील प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली होती.

त्याच दरम्यान ईडीने जी चौकशी सुरू केली आहे त्याबाबत त्यांना अशी शंका आहे की, जे पैसे 32 ते 35 कोटी किंवा 100 कोटींचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. 100 कोटीपर्यंतचा फंड सुजित पाटकरांना मिळाला होता. त्यामुळे याप्रकरणी ईडीकडून देखील याची चौकशी झाली पाहिजे. त्यामुळेच ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ही चौकशी सुरू केली.

Shinde Vs Thackeray राड्यात विधिमंडळ प्रशासन बुचकळ्यात; नियमांचा पडणार किस

कोण आहेत सुजित पाटकर?

सुजित पाटकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. त्याशिवाय संजय राऊतांच्या मुलींबरोबर एका कंपनीत सुजित पाटकर हे भागीदार होते.

याशिवाय अलिबागमध्ये जी जागा खरेदी झाली होती. 8-10 प्लॉट संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या नावावर खरेदी करण्यात आली होती. त्याच प्लॉटमध्ये सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांचं नाव देखील होतं. त्याच प्रकरणात पत्रा चाळ घोटाळ्याची देखील चौकशी झाली होती आणि ज्यामध्ये संजय राऊत यांना अटकही झालेली.

जेव्हा पत्रा चाळ प्रकरणी सुजित पाटकरांच्या घरी छापे मारण्यात आले होते तेव्हा त्यात ईडीला कोव्हिड सेंटर आणि अलिबागच्या जागेबाबत काही कागदपत्रं सापडली होती. त्यानंतर हा एफआयआर नोंदविण्यात आला होता. त्यात आता नवीन ईसीआयर नोंदविण्यात आला. त्यातच ईडीने ही नवी चौकशी सुरू केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT