Independence Day History : जेव्हा सोलापूरकरांनी पारतंत्र्यातही ३ दिवस उपभोगलं स्वातंत्र्य

मुंबई तक

– विजयकुमार बाबर, सोलापूर प्रतिनिधी देशभरात आज स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हजारो स्वातंत्र्य सैनिक यांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपल्या पूर्वजांनी केलेल्या कष्टाचं फळ म्हणून आजची पिढी देशात मोकळा श्वास घेते आहे. महाराष्ट्रातून अनेक क्रांतीकारक या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. आज संपूर्ण देश स्वातंत्र्य दिवस साजरा करत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

– विजयकुमार बाबर, सोलापूर प्रतिनिधी

देशभरात आज स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हजारो स्वातंत्र्य सैनिक यांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपल्या पूर्वजांनी केलेल्या कष्टाचं फळ म्हणून आजची पिढी देशात मोकळा श्वास घेते आहे. महाराष्ट्रातून अनेक क्रांतीकारक या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते.

आज संपूर्ण देश स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना महाराष्ट्रातलं एक शहर १९३० साली ३ दिवसांसाठी स्वतंत्र झालं होतं. सविनय कायदेभंग चळवळीत गांधीजींना अटक झाल्यानंतर सोलापुरात त्याचे पडसाद उमटले…यानंतर घडलेल्या एका घटनेमुळे सोलापुरातून ब्रिटीशांना ३ दिवसांसाठी का होईना पण काढता पाय घ्यावा लागला होता. आजच्या दिवशी जाणून घेणार आहोत ब्रिटीशांच्या मनात धडकी भरवणाऱ्या सोलापूरी जनतेच्या उठावाची कहाणी…

स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी भारताचं नेतृत्व करत असताना त्याांनी सविनय कायदेभंगाची घोषणा केली. सोलापुरच्या जनतेने या लढ्यात गांधीजींना चांगली साथ दिली. ही चळवळ दडपण्यासाठी ५ मे १९३० मध्ये ब्रिटीशांनी महात्मा गांधींना अटक केली, ज्याचे पडसाद सोलापुरात उमटायला लागले. गांधीजींना झालेल्या अटकेविरुद्ध निषेध म्हणून सोलापुरची जनता रस्त्यावर उतरली. दररोज २० हजारांचा जमाव रस्त्यावर येऊन सभा, प्रभातफेरी, दारुचे अड्डे बंद पाडणं अशी काम करायला लागला.