Pfizer, J & J, Moderna यांच्यासोबत भारताची लसींसाठी चर्चा सुरू
Pfizer, J & J, Moderna यांच्यासोबत कोरोना प्रतिबंधक लसी मिळवण्यासाठी भारत सरकारने चर्चा सुरू केली आहे. आत्तापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या या कंपन्यांसोबत पार पडल्या आहेत. फायजर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या तिन्ही कंपन्यांना आम्ही लसी पुरवण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत महाभयंकर अशी लाट ठरली आहे. अशात लसीकरण […]
ADVERTISEMENT

Pfizer, J & J, Moderna यांच्यासोबत कोरोना प्रतिबंधक लसी मिळवण्यासाठी भारत सरकारने चर्चा सुरू केली आहे. आत्तापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या या कंपन्यांसोबत पार पडल्या आहेत. फायजर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या तिन्ही कंपन्यांना आम्ही लसी पुरवण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत महाभयंकर अशी लाट ठरली आहे. अशात लसीकरण करून जास्तीत लोकांना सुरक्षित करणं हे सरकारचं उद्दिष्ट होतं मात्र लसींचा तुटवडा भासू लागला आहे. भारतात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. तिसरी लस आहे ती म्हणजे रशियाची स्पुटनिक व्ही. यासोबतच इतर कंपन्यांशीही भारत सरकारने चर्चा सुरू केली आहे.
या कंपन्यांना लसींचा पुरवठा व उत्पादन करण्यासाठी सरकारने सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं आहे असे सरकारने एका निवेदनात म्हटले आहे. “मान्यताप्राप्त कोणत्याही परदेशी उत्पादकाचा कोणताही अर्ज औषध नियंत्रकांकडे प्रलंबित नाही असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे.
Vaccination बाबत मोदी सरकारच्या कोणत्या चुकीच्या निर्णयांमुळे भासतोय लस तुटवडा?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर माजवला आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग होतो आहे तसंच अनेकांचे मृत्यूही झाले आहेत. कोरोनाची पहिली लाट दुसऱ्या लाटेपेक्षा काहीशी सौम्य होती असं म्हणायची वेळ आली आहे इतकी दुसरी लाट भीषण आहे. दुसऱ्या लाटेमध्ये लसीकरणावर भर देण्यात आला आहे. तरीही देशातल्या अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा भासतो आहे.