Indian CEO : जगात भारतीयांचा डंका! हे आहेत दिग्गज कंपन्यांचे ‘बॉस’
सध्या जगभरातील दिग्गज कंपन्यांच्या प्रमुख पदांवर भारतीयांचा डंका कायम आहे. व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube ने भारतीय वंशाचे नील मोहन यांची CEO म्हणून नियुक्ती केली. यूट्यूबच्या सीईओपदी नील मोहन यांची नियुक्ती झाल्याने भारताची मान उंचावली आहे. जगातील मोठ्या कंपनीच्या प्रमुख पदांवर असणारे नील मोहन एकमेव नाहीत, अशी अनेक नावं आहेत. Google आणि Alphabet चे CEO सुंदर […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सध्या जगभरातील दिग्गज कंपन्यांच्या प्रमुख पदांवर भारतीयांचा डंका कायम आहे.
हे वाचलं का?
व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube ने भारतीय वंशाचे नील मोहन यांची CEO म्हणून नियुक्ती केली.
ADVERTISEMENT
यूट्यूबच्या सीईओपदी नील मोहन यांची नियुक्ती झाल्याने भारताची मान उंचावली आहे.
ADVERTISEMENT
जगातील मोठ्या कंपनीच्या प्रमुख पदांवर असणारे नील मोहन एकमेव नाहीत, अशी अनेक नावं आहेत.
Google आणि Alphabet चे CEO सुंदर पिचाई हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहेत. ते भारतीय वंशाचे आहेत.
पिचाई यांनी Google Chrome आणि Chrome OS विकसित करण्यासाठी प्रोडक्ट मॅनेजमेंट टीमचे नेतृत्व केले.
सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला भारतीय वंशाचे आहेत.
सत्य नारायण नाडेला 1992 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये इंजिनियर म्हणून रुजू झाले होते.
दिग्गज कॉफी कंपनी स्टारबक्सने भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा केली आहे.
1 एप्रिलपासून लक्ष्मण नरसिंहन कंपनीची सूत्रे पूर्णपणे हाती घेतील.
जगातील प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनी Adobe Inc चे CEO शंतनू नारायण हे ही भारतीय वंशाचे आहेत.
शंतनू नारायण यांना 2011 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी यांच्या व्यवस्थापन सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले होते.
अरविंद कृष्णा हे जगातील आयटी कंपनीचे सीईओ आहेत. 2020 च्या सुरुवातीला IBM ने त्यांची सीईओ पदावर नियुक्ती केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT