लाइव्ह
IPL Auction 2024 Live : पॅट कमिन्सला टाकलं मागे, ‘हा’ खेळाडू ठरला IPL मधला सर्वात महागडा खेळाडू
IPL Auction 2024 Live Update : यंदा प्रथमच आयपीएल 2024 साठी खेळाडूंचा लिलाव भारताबाहेर म्हणजेच दुबईत पार पडणार आहे. दुबईतील कोका-कोला एरिना येथे या लिलावाला दुपारी 1 वाजता सुरुवात होणार आहे. या लिलावात एकूण 333 खेळाडूंवर बोली लागणार आहे. तर आयपीएल संघांकडे फक्त 77 स्लॉट उपलब्ध आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात कोणत्या खेळाडूचे नशीब चमकते? कोणता खेळाडू महागडा ठरतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यासह आयपीएलच्या लिलावासंबंधीत सर्व अपडेट्स तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत.
ADVERTISEMENT
ipl auction 2024 live updates in dubai venue 333 players in auction indian premier league season 17
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 08:24 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : हे युवा खेळाडू राहिले अनसोल्ड
कमलेश नागरकोटी, प्रदोष पॉल, अजितेश, गौरव चौधरी, बिपिन सौरभ, के.एम. आसिफ,शाकिब हुसेन, मोहम्मद कैफ,अभिलाष शेट्टी, गुरजपनीत सिंग, रोहित रायडू,पृथ्वी राज यारा आणि शुभम अग्रवाल हे खेळाडू अनसोल्ड राहिले. - 08:19 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : प्रिन्स चौधरी पंजाब किंग्जच्या ताफ्यात
पंजाब किंग्ज संघाने प्रिन्स चौधरीला संघात सामील केले आहे. पंजाबने प्रिन्सला 20 लाखाच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. - 08:10 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : रिचर्डसन-रहमानला कोणत्या संघाने केले खरेदी?
दिल्ली कॅपिटल्सने झाय रिचर्डसनला 5 कोटी रुपयांना त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. तर मुस्तफिजुर रहमान 2 कोटींच्या मूळ किमतीत CSK चा भाग बनला आहे. - 06:38 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : कुमार कुशाग्र दिल्लीच्या ताफ्यात
कुमार कुशाग्र यांनाही चांगली रक्कम मिळाली आहे. यष्टिरक्षक फलंदाज कुशाग्राला दिल्ली कॅपिटल्सने 7.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. कुशाग्रची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. - 06:38 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : यश दयाल आरसीबी संघातून आयपीएल खेळणार
यश दयालला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 5 कोटींना विकत घेतले आहे. यश दयाल गेल्या मोसमात गुजरात टायटन्सचा भाग होता. रिंकू सिंगने अखेरच्या षटकात यशच्या चेंडूवर पाच षटकार ठोकले होते. - 05:56 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : शाहरुख खान गुजरात टायटन्सच्या ताफ्यात
शाहरुख खानला गुजरात टायटन्सने ७.४० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. शाहरुखची मूळ किंमत 40 लाख रुपये होती. दुसरीकडे, रमणदीप सिंगला कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. - 03:59 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : जयदेव उनाडकट सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात
जयदेव उनाडकटला सनरायझर्स हैदराबादने 1.60 कोटी रुपयांना विकत घेतले. तर जोश हेझलवूड अनसोल्ड राहिला आहे. - 03:51 PM • 19 Dec 2023
Mitchell Starc: : मिचेल स्टार्क IPL मधला सर्वात महागडा खेळाडू
मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. मिचेल स्टार्कची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. गुजरात टायटन्सने स्टार्कला विकत घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण शेवटी लिलावात केकेआरने विजय मिळवला आहे. - 03:37 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : शिवम मावी लखनऊकडून आयपीएल खेळणार
शिवम मावीला लखनऊ सुपर जायंट्सने 6.40 कोटी रुपयांना विकत घेतले. मावीची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. - 03:35 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : उमेश यादव गुजरात टायटन्सच्या ताफ्यात
वेगवान गोलंदाज उमेश यादवला गुजरात टायटन्सने 5.8 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. उमेश यादवची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. - 03:32 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : लॉकी फर्ग्युसन राहिला अनसोल्ड, चेतन केकेआरकडून खेळणार
लॉकी फर्ग्युसन अनसोल्ड राहिला आहे. फर्ग्युसनची बेस प्राईज 2 कोटी रुपये होती. चेतन साकारियाला कोलकाता नाईट रायडर्सने 50 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे. - 03:27 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : अल्झारी जोसेफ आरसीबीकडून खेळणार
आरसीबीने अल्झारी जोसेफला 11.50 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. अल्झारीची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. - 03:24 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : के.एस. भरत कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार
के.एस. भरतने कोलकाता नाईट रायडर्सला 50 लाख रुपयांना विकत घेतले आहे. त्यामुळे भरत कोलकाता नाईट रायडर्सकडून मैदानात खेळणार आहे. - 03:21 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : ट्रिस्टन स्टब्स दिल्लीच्या ताफ्यात
ट्रिस्टन स्टब्सला दिल्ली कॅपिटल्सने 50 लाखांच्या मूळ किमतीत त्यांच्या संघात सामील केले आहे. - 03:19 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : इंग्लंडचा स्टार क्रिकेटर फिल सॉल्ट राहिला अनसोल्ड
आयपीएल लिलावाच्या तिसऱ्या फेरीत फिल सॉल्टने अनसोल्ड राहिला आहे. फिल सॉल्टची बेस प्राईज दीड कोटी रुपये होती. - 03:15 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : आयपीएल संघाच्या पाकिटात किती पैसे उरले?
आरसीबी- 23.25 कोटी केकेआर - 32.70 कोटी पंजाब किंग्स- 13.15 कोटी सीएसके- 11.60 कोटी दिल्ली कॅपिटल्स- 24.95 कोटी राजस्थान रॉयल्स- 7.10 कोटी मुंबई इंडियंस- 12.75 कोटी हैदराबाद - 5.20 कोटी सुपर जायंट्स- 13.15 कोटी टायटन्स- 37.65 कोटी - 03:01 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : आयपीएलमध्ये आतापर्यंत 12 खेळाडूंचा लिलाव
1. रोव्हमन पॉवेल (वेस्टइंडीज) : 7.40 कोटी, राजस्थान रॉयल्स (बेस प्राइस- 1 कोटी) 2. हॅरी ब्रूक (इंग्लंड)- 4 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राइस- 2 कोटी) 3. ट्रेविस हेड (ऑस्ट्रेलिया)- 6.80 कोटी, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 2 कोटी) 4. वानिंदु हसारंगा (श्रीलंका)- 1.50 कोटी, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 1.5 कोटी) 5. रचिन रवींद्र (न्यूजीलंड)- 1.80 कोटी, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 50 लाख) 6. शार्दुल ठाकुर (भारत)- 4 कोटी, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 2 कोटी) 7. अजमतुल्लाह उमरजई (अफगानिस्तान)- 50 लाख, गुजरात टाइटन्स (बेस प्राइस- 50 लाख) 8. पॅट कमिंस (ऑस्ट्रेलिया)- 20.50 कोटी, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 2 कोटी) 9. जेराल्ड कोएत्जी (साउथ अफ्रीका)- 5 कोटी, मुंबई इंडियंस (बेस प्राइस- 2 कोटी) 10. हर्षल पेटल (भारत)- 11.75 कोटी, पंजाब किंग्स ((बेस प्राइस- 2 कोटी) 11. डेरिल मिचेल (न्यूजीलंड)- 14 कोटी, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 1 कोटी) 12. क्रिस वोक्स (इंग्लंड)- 4.20 कोटी़, पंजाब किंग्स (बेस प्राइस- 2 कोटी) - 02:55 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : इंग्लंडच्या ख्रिस वोक्सला पंजाबने घेतले विकत
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सला पंजाब किंग्जने 4.20 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. वोक्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. - 02:49 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : डेरिल मिशेलला चेन्नई सुपर किंग्सने घेतलं ताफ्यात, किती बोली लागली?
डेरिल मिशेलला चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटींना विकत घेतले आहे. मिशेलने क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध दोन शतके झळकावली होती. - 02:40 PM • 19 Dec 2023
IPL Auction 2024 Live Update : जेराल्ड कोएत्झी मुंबईकडून खेळणार
साऊथ आफ्रिकेचा फास्ट बॉलर जेराल्ड कोएत्झी मुंबईकडून खेळणार आहे. जेराल्ड कोएत्झीला मुंबई इंडियन्सने 5 कोटींना विकत घेतले आहे. कोएत्झीची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT