मुख्यमंत्र्यांनी ‘त्या’ सर्व ऑडिओ क्लिप्स ऐकाव्यात-फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण मुख्यमंत्र्यांनी किती गांभीर्याने घेतलं आहे ते माहित नाही. त्यांचं या सगळ्या प्रकरणाबद्दलचं वक्तव्य मी ऐकलं. कदाचित त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं नाही किंवा त्यांनी याबद्दलची सखोल माहिती घेतलेली नाही. माझं मत असं आहे की एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या सगळ्या क्लिप्स काळजीपूर्वक ऐकाव्यात म्हणजे त्यांना या प्रकरणातलं गांभीर्य समजेल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणातली माहिती नीट घ्यावी म्हणजे कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आहे हे त्यांना लक्षात येईल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली. ही मुलगी पुण्यात इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती, ती भावासोबत राहात होती. ती पुण्यात ज्या इमारतीत वास्तव्य करत होती त्याच इमारतीवरून उडी मारून तिने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर 12 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. यानंतर भाजपने वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर या प्रकरणी आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पाहा मुंबई तकचा खास व्हिडीओ

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबद्दल जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलं तेव्हा “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल.त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. सत्य जनतेसमोर आणलं जाईल यात काहीही शंका नाही. गेले काही दिवस, काही महिने असंही लक्षात आलं आहे की आयुष्यातून उठवण्याचाही प्रयत्न केला जातो आहे. असा प्रयत्न होऊ नये आणि सत्यही समोर आलं पाहिजे यासाठी योग्य जे काही असेल ते केलं जाईल.” असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

ADVERTISEMENT

त्यांच्या या वक्तव्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सगळं प्रकरण मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावं असं देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलं आहे. तसंच व्हायरल झालेल्या 12 ऑडिओ क्लिप्स ऐकाव्यात असाही सल्ला दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT