215 कोटी वसुली प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या; पोस्ट शेअर करत म्हणाली..
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होत आहे. 215 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात ईडीने अभिनेत्रीचे नाव आरोपी म्हणून ठेवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने जॅकलिन फर्नांडिसविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. जॅकलिन फर्नांडिसलाही वसुलीच्या रकमेचा फायदा झाल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. सुकेश हा गुन्हेगार असल्याचे तिला माहीत होते. यासंदर्भात जॅकलिन फर्नांडिसने एक पोस्ट शेअर केली आहे. जॅकलिन […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होत आहे. 215 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात ईडीने अभिनेत्रीचे नाव आरोपी म्हणून ठेवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने जॅकलिन फर्नांडिसविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. जॅकलिन फर्नांडिसलाही वसुलीच्या रकमेचा फायदा झाल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. सुकेश हा गुन्हेगार असल्याचे तिला माहीत होते. यासंदर्भात जॅकलिन फर्नांडिसने एक पोस्ट शेअर केली आहे.
जॅकलिन फर्नांडिसने शेअर केली पोस्ट
जॅकलिन फर्नांडिसने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “प्रिय, मी जगातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे. मी ताकदवर आहे. मी स्वत: ला स्विकारलं आहे. लवकरच सर्व काही ठीक होईल. मी मजबूत आहे. मी माझी सर्व स्वप्ने पूर्ण करीन. मी सर्व काही करू शकते.” या पोस्टमध्ये जॅकलिन फर्नांडिसने ही पोस्ट का शेअर केली हे सांगितलेले नाही. जॅकलिन फर्नांडिसने ईडी आणि सुकेशच्या प्रकरणावर बराच काळ मौन बाळगले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ईडीने जॅकलीनला पूर्णपणे वेठीस धरले आहे. त्याच वेळी, आता ईडीने अभिनेत्रीवर 215 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला आहे. ईडीने आज अभिनेत्रीविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सुकेश हा गुन्हेगार असून तो तिहार तुरुंगात आहे हे जॅकलिनला माहीत होते, पण तरीही तिने त्याच्याकडून भेटवस्तू घेतल्या.