Ramesh Bais : झारखंडमध्ये सरकारशी संघर्ष; महाराष्ट्रात काय होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ramesh Bais Maharashtra’s New Governor :

ADVERTISEMENT

मुंबई : वादग्रस्त ठरलेले भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून अखेर मुक्त करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. कोश्यारींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे पदमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांनी दिलेला राजीनामा आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. (Ramesh Bais also has the same background as Bhagat Singh Koshyari.)

जवळपास 3 वर्षे राज्यपालांच्या खुर्चीवर असलेले कोश्यारी यांनी अनेकदा आपल्या वक्तव्यांनी आणि निर्णयांनी वाद निर्माण केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांचा महाविकास आघाडीसोबतचा वाद उघडपणे दिसून आला. तर दुसरीकडे विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधत भाजपच्या इशाऱ्यावर काम केल्याचा आरोप केला. मात्र आता अखेर त्यांना या पदावरुन हटविण्यात आलं आहे. त्यांच्याजागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

रमेश बैस यांचीही पार्श्वभूमी काहीशी कोश्यारी यांच्यासारखीचं :

रमेश बैस यांचीही पार्श्वभूमी काहीशी कोश्यारी यांच्यासारखीचं आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस या दोन पक्षांचे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. याच सरकारमध्ये आणि राज्यपाल असताना बैस यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. रमेश बैस यांनी झारखंड विधानसभेत संमत केलेलं झारखंड वित्त विधेयक 2022 परत पाठवले होते. सुधारणा करण्याच्या सूचना देऊन तीनवेळा त्यांनी हे विधेयक परत पाठवले होते. त्यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल रमेश बैस यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला.

Bhagat Singh Koshyari : कोश्यारींचा राजीनामा मंजूर, बैस नवे राज्यपाल

ADVERTISEMENT

फेब्रुवारी २०२२ मध्ये महिन्यात रमेश बैस यांनी झारखंडमध्ये आदिवासी सल्लागार परिषद स्थापन करण्याबाबत राज्य सरकारने केलेल्या नियमांवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ही नियमावली घटनात्मक तरतुदींच्या विरोधात आणि राज्यपालांच्या अधिकारांवर अतिक्रमण असल्याची तक्रार त्यांनी केंद्राकडे केली होती. त्यांनी आदिवासी सल्लागार परिषदेशी संबंधित मॅन्युअल्स आणि त्याच्या स्थापनेशी संबंधित फाईल राज्य सरकारला परत केली आणि त्यात बदल करण्यास सांगितले. या मुद्द्यावरून राजभवन आणि सरकार यांच्यातील कोंडी आजतागायत सुटलेली नाही.

ADVERTISEMENT

Ramesh Bais: नगरसेवक ते महाराष्ट्राचे राज्यपाल, कोण आहेत रमेश बैस?

याशिवाय रमेश बैस यांनी झारखंड विधानसभेत सरकारने मंजूर केलेली विधेयके विधेयक परत करण्याचा विक्रमही केला आहे. मॉब लिंचिंग विरोधी विधेयक, कृषी मंडी विधेयकासह तब्बल ९ विधेयके त्यांनी परत केली आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणे यांसारख्या विविध प्रसंगी त्यांनी सरकारच्या कामात हस्तक्षेप केल्याची चर्चा होती. विविध विभागांच्या आढावा बैठकांमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे आता बैस यांचे महाराष्ट्रात कसं होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT