Jitendra Awhad : “महाराष्ट्रात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, RSSचा निर्णय”
Jitendra Awhad Twitter : हिवाळी अधिवेशन संपताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटने राजकीय वर्तुळात तर्कविर्तक लावले जात आहेत… ट्विटमध्ये काय केलाय दावा?
ADVERTISEMENT

Jitendra Awhad on Bjp Election : काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेतील काही नेते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला तोंड फुटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आव्हाडांनी भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाबद्दल पोस्ट करत मोठा दावा केला आहे. (Jitendra Awhad tweet About bjp and elections 2024)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात आव्हाडांनी म्हटले आहे की, “नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले.”
भाजप-संघाच्या बैठकीबद्दल आव्हाडांचा मोठा दावा
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत, त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले”, अशी माहिती त्यांनी पोस्टमध्ये दिली आहे.
हेही वाचा >> “मोदी-शाहांनी डॉ. आंबेडकर, सरदार पटेलांनाही…”, ठाकरेंचा घणाघाती हल्ला
“ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही”, असे म्हणत राजकीय वर्तुळातील अनिश्चितेबद्दल त्यांनी भाष्य केले आहे.










