Crime : पगारवाढ रोखल्याच्या रागातून वरिष्ठाची हत्या… पोलीस दलात खळबळ
Crime news Kalyan : कल्याण : नोकरदार वर्गासाठी ‘पगारवाढ’ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय समजला जातो. आपल्या वर्षभराच्या कामाचं मुल्यमापन होऊन पगारवाढ झाल्यानंतर होणारा आनंद अवर्णणीय असतो. खास करुन आजच्या महागाईच्या काळात ही दिलासादायक गोष्ट समजली जाते. पण जर पगारवाढ मिळाली नाही तर त्यातून होणारा त्रागा, राग या गोष्टीही अनेकांनी अनुभवल्या असतील. (Dun to not get […]
ADVERTISEMENT
Crime news Kalyan :
ADVERTISEMENT
कल्याण : नोकरदार वर्गासाठी ‘पगारवाढ’ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय समजला जातो. आपल्या वर्षभराच्या कामाचं मुल्यमापन होऊन पगारवाढ झाल्यानंतर होणारा आनंद अवर्णणीय असतो. खास करुन आजच्या महागाईच्या काळात ही दिलासादायक गोष्ट समजली जाते. पण जर पगारवाढ मिळाली नाही तर त्यातून होणारा त्रागा, राग या गोष्टीही अनेकांनी अनुभवल्या असतील. (Dun to not get increment constable murdered senior police officer)
मात्र हीच पगारवाढ रोखल्यानं रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या एका संतप्त कॉन्स्टेबलने वरिष्ठांची म्हणजेच उपनिरीक्षकाची थेट हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. बसवराज गर्ग असं मृत उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर पंकज यादव असं आरोपी कॉन्स्टेबलचं नाव आहे. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
हे वाचलं का?
BJP च्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये… राऊतांचा काँग्रेसला सल्ला
याबाबत कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पंकज यादव आणि बसवराज गर्ग दोघेही २०१० साली एकत्र काम करत होते. पंकज यादव यांची बसवराज गर्ग यांनी विभागीय चौकशी केली होती, त्यात पंकज यादव यांची ४ वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आली होती. त्यामुळे ४ वर्षांपासून बसवराज गर्ग यांच्याविरोधात संतप्त होता. पंकज यादवची सध्याची पोस्टिंग पेण आरपीएफ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रोहा येथे आहे. याच रागातून पंकज यादव बुधवारी (८ फेब्रुवारी) दुपारी ३.३० वाजता पेणहून कल्याणला आला. बसवराज यांची संपूर्ण माहिती घेतली.
ADVERTISEMENT
Crime : सकाळी बातमी आली, दुपारी गाडीने उडवलं; हा पत्रकाराचा खूनच! कोणी केला आरोप?
ADVERTISEMENT
रात्री पावणेदहाच्या सुमारास उपनिरीक्षक बसवराज गर्ग हे कल्याणच्या बॅरेक रूममध्ये कानात इअरफोन लावून गाणी ऐकत असताना आरोपी पंकज यादव याने बॅरेकमध्ये जाऊन बसवराज गर्ग यांच्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गर्गचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपीने पळ काढला आणि रोहा गाठला. यानंतर कोळसेवाडी पोलिसांनीपोलिसांनी तपास करुन संशयित आरोपी पंकज यादव याला अटक केली आहे. पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT