कल्याण CCTV व्हिडीओ : काळ आला होता, पण…; ‘त्या’ दोघी धावल्या म्हणून वाचले प्राण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्थानकावरुन एक्स्प्रेस गाडी पकडण्याच्या नादात जीव गमावल्याच्या वा गंभीर दुखापत झाल्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहे. अलीकडच्या काळात रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे अनेकांचे जीवही वाचत आहे, अशीच एक घटना आता समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकावरील या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

ADVERTISEMENT

कल्याण रेल्वे स्थानकावर गुरूवारी ही घटना घडली आहे. एक व्यक्ती एक्स्प्रेस गाडी स्थानकावरून सुटल्यानंतर बॅग देण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र गाडीने गती पकडली असल्यानं बॅग देण्याच्या नादात व्यक्तीचा बॅगेसह तोल जातो आणि तो खाली कोसळतो. बॅग पकडण्याच्या प्रयत्नात हा व्यक्ती गाडीखाली जाण्याच्या आधीच रेल्वे स्थानकावरील महिला कॉन्स्टेबलनी धाव घेतली.

रेल्वे पोलीस दलाच्या कॉन्स्टेबल राधिका सेन आणि वैशाली पटेल यांनी प्रसंगावधान दाखवत त्या प्रवाशाला तातडीने प्लॅटफॉर्मच्या दिशेनं ओढलं. त्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.

हे वाचलं का?

ही घटना घडत असताना स्थानकावरील उपस्थितांच्या अंगावर शहारेच आले होते. इतकंच नाही, तर सगळेच घटना घडलेल्या दिशेनं धावलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाकडून हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. प्रवाशांनी गाडी सुटल्यानंतर चढण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहनही कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT