कल्याण: निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेखाली उडी घेत केली आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, कल्याण: पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. दिलीप सकपाळे (33) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण जीआरपी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ADVERTISEMENT

बदलापूरमध्ये राहणारे दिलीप सकपाळे हे कल्याण जीआरपीमध्ये कार्यरत होते. दिलीप यांना दारुचे व्यसन होते. दिवसरात्र ते दारुच्याच नशेत असायचे. दारुच्या नशेत त्यांच्याकडून अनेकदा गैरवर्तन घडत होतं. तसेच सातत्याने ते ड्युटीवर देखील जात नव्हते. याच सगळ्या वर्तणुकीमुळे त्यांना 15 दिवसांपूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं.

दरम्यान, या सगळ्या नैराश्येतून त्यांनी बुधवारी रात्री आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. सकपाळे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे मार्गादरम्यान त्यांचा मृतदेह रेल्वे रुळालगत अप लाईनला आढळून आला.

हे वाचलं का?

या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतेदह ताब्यात घेतला. यावेळी दिलीप यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एडीआर दाखल करीत तपास सुरु केला आहे. एका निलंबित पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस खात्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

ADVERTISEMENT

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आमदाराच्या निवासस्थानी नियुक्ती करण्यात आलेल्या पोलीस शिपायाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे घडली होती. पोलीस शिपायाने राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली होती. प्रमोद शेकोकर असं मयत पोलीस शिपायाचं नाव होतं. या घटनेनं देखील पोलीस दलात खळबळ उडाली होती.

प्रमोद शेकोकर हे प्राणहिता पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची पत्नीही पोलीस दलात असून, ताडगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहे. रविवारी (२० फेब्रुवारी) रात्री त्यांनी अहेरी येथील पॉवर हाऊस कॉलनीमधील राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती.

वाढदिवसाचा केक कापताना पतीशी वाद,
सकाळी गळफास घेऊन पत्नीची आत्महत्या

आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी व्यक्त केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT